Manipur Violence : मणिपूरमधील उखरुलमध्ये पुन्हा हिंसाचार ; एक जवान हुतात्मा

134
Manipur Violence : मणिपूरमधील उखरुलमध्ये पुन्हा हिंसाचार ; एक जवान हुतात्मा
Manipur Violence : मणिपूरमधील उखरुलमध्ये पुन्हा हिंसाचार ; एक जवान हुतात्मा

मणिपूरच्या उखरूल (Ukhrul of Manipur) शहरात बुधवारी स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत एका भूखंडाची साफसफाई करण्यावरून दोन गटांमध्ये – झालेल्या वादाचे पर्यवसान परस्परांवर गोळीबार करण्यात झाले. त्यात मणिपूर रायफल्सचा एक जवान हुतात्मा व दोन नागरिकांचा मृत्यू झाला व काही जण जखमी झाले.

या चकमकीनंतर सदर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. दोन युवकांच्या अपहरणाच्या निषेधार्थ मैतेई जमातीच्या (Maitei tribe) जॉइंट अॅक्शन कमिटीने (जेएसी) पुकारलेल्या बंदचा इम्फाळ खोऱ्यातील (Imphal Valley) पाच जिल्ह्यांतील जनजीवनावर परिणाम झाला आहे.नागा समुदायातील दोन गटात वाद झाला. ते गट दोन वेगवेगळ्या गावांतील आहेत. मणिपूर पोलिस, आसाम रायफल्सचे (Assam Rifles) जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

(हेही वाचा –Pune News: पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतुकीत बदल! ‘हे’ रस्ते राहणार बंद)

दहशतवाद्याची हत्या

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील लीशांग गावाजवळ अज्ञात व्यक्तींनी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्वयंघोषित टाऊन कमांडरची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. मृत दहशतवाद्याचे नाव सेखोहाओ हाओकिप असून तो युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा (यूकेएनए) सदस्य आहे, पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी १२:१५ वाजता चुराचंदपूर येथील तोरबुंग बंगल्यापासून दीड किमी अंतरावर ही घटना घडली.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.