कुकी अतिरेक्यांनी रविवारी (१० नोव्हें.) मणिपूरच्या इम्फाळ पूर्वेकडील सनसाबी या मैतेईचे वर्चस्व असलेल्या गावावर हल्ला (Manipur violence) केला. पोलिसांनी सांगितले की, सशस्त्र अतिरेक्यांनी भात कापणी करणाऱ्या मैतेई शेतकऱ्यांवर प्रथम गोळीबार केला आणि नंतर बॉम्ब फेकले. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस आणि बीएसएफचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर दहशतवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक सुरू झाली. (Manipur violence)
(हेही वाचा-भारताला अमेरिकेतील सत्तांतराची चिंता नाही; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी सांगितले कारण)
४० मिनिटे चाललेल्या गोळीबारात बीएसएफच्या चौथ्या महार रेजिमेंटचा एक जवान जखमी झाला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मणिपूरमध्ये 8 ते 10 नोव्हेंबर या तीन दिवसांत 7 हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये बीएसएफच्या 1 जवानाच्या दुखापतीशिवाय 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका डॉक्टरचाही मृत्यू झाला आहे. (Manipur violence)
(हेही वाचा-Pollution In Mumbai : मुंबईकरांनो सावधान; तुम्ही दररोज शोषत आहात पाच सिगारेटएवढा धूर)
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्त्नुसार, मैतेईच्या एका शेतकऱ्याने सांगितले की, ‘मी भातशेतीत गवत गोळा करत असताना माझ्या शेजारी एक बॉम्ब पडला. कुकी अतिरेक्यांनी उयोक चिंग मानिंग (उयोक हिल) येथून हल्ला केला. बॉम्ब फेकल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला, त्यामुळे मी घाबरलो आणि माझे काम सोडून सुरक्षित ठिकाणी गेलो आणि जीव वाचवण्यासाठी लपलो.’ अशी माहिती स्थानिकांनी दिली. (Manipur violence)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community