Manipur Violence : मणिपूरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिरेकी हल्ला

77
Manipur Violence : मणिपूरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिरेकी हल्ला
Manipur Violence : मणिपूरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिरेकी हल्ला

मणिपूरमध्ये (Manipur Violence) वर्षभरात झालेल्‍या हिंसाचाराबद्दल मुख्‍यमंत्री बिरेन सिंह (CM Biren Singh) यांनी माफी मागितल्यानंतर अवघ्या काही तासात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. राज्याच्या इम्फाळ (Imphal) पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद परिसरात अतिरेक्यांनी गोळीबारानंतर बॉम्‍बफेक केल्याची घटना घडली. (Manipur Violence)

हेही वाचा-Gas Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरूवातीला ‘कमर्शिअल गॅस सिलेंडर’च्या दरात कपात

यासंदर्भातील माहितीनुसार आज, बुधवारी (१ जाने.) पहाटे मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद भागात संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांनी गोळीबार केला. पश्चिम जिल्ह्यातील सखल कडंगबंद भागात बॉम्बफेकही केली. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला ग्राम स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल या भागात पाठवण्यात आले आहे. (Manipur Violence)

हेही वाचा-नववर्षानिमित्त Raj Thackeray यांचा मनसैनिकांसाठी खास संदेश; म्हणाले, “निवडणुकीत जे घडलं ते…”

दरम्‍यान, मणिपूरमध्ये 3 मे 2023 मध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून संशयित अतिरेक्यांनी कडंगबंद भागात अनेक हल्ले केले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी 31 डिसेंबर रोजी वर्षभरातील हिंसाचारासाठी राज्याच्या जनतेची क्षमायाचना करून नवीन वर्षात शांततेने एकत्र नांदण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा हिंसाचार उफाळण्याची भीती निर्माण झाली आहे. (Manipur Violence)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.