मणिपूरच्या (Manipur Violence) कांगपोकपी (Kangpokpi) जिल्ह्यामध्ये कुकी निदर्शक (Cookie indicator) आणि सुरक्षा दलांमध्ये (security forces) शनिवारी (८ मार्च) संघर्ष झाल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण झाली. या संघर्षामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून 27 जण जखमी झाले. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव लालगौथासिंह सिंगसिट असे आहे. जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Manipur Violence)
Peace has come to Manipur ! pic.twitter.com/eVkE6qn3y4
— NinglunHanghal (@ninglunhanghal) March 8, 2025
इंफाळ-दिमापूर महामार्गावर (Imphal-Dimapur Highway) सर्व प्रकारच्या वाहनांना मुक्त प्रवेश देण्यात येत होता. मात्र त्यानंतर काही वेळातच कुकी समुदायाचे लोक आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. कुकी समुदायाकडून सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. इंफाळ-दिमापूर महामार्गावर कोणत्याही बंधनाशिवाय वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या निर्णयाला विरोध करत कुकी समुदायाचे लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी हा रस्ता अडवला, यावेळी सैनिकांनी त्यांना त्या ठिकाणावरून हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुकी आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 27 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. (Manipur Violence)
Manipur today pic.twitter.com/Jl2VCviXsE
— Bikash Singh (@bikash_ET) March 8, 2025
पोलिसांनी अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या. मैतेईंच्या ‘फेडरेशन ऑफ सिव्हिल सोसायटी’ने (एफओसीएस) या संघटनेने काढलेल्या शांतता मोर्चाला विरोध करणे हाही कुकींच्या निदर्शनांचा हेतू होता. निदर्शकांनी खासगी वाहने पेटवून दिली आणि इम्फाळहून सेनापती जिल्ह्याकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर परिस्थिती चिघळली. निदर्शकांनी एनएच-२ हा (इम्फाळ-दिमापूर) राष्ट्रीय महामार्गही बंद करण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी वाहनांच्या वाहतुकीत अडथळे आणण्यासाठी रस्त्यावर टायर जाळले. (Manipur Violence)
हेही वाचा-क्षेपणास्त्र, दारूगोळा वाहून नेणारी आठवी Barge LSAM 11 नौदलास सुपूर्द
सुरक्षा दलांनी कुकी समुदायाच्या लोकांना महामार्गावरून हटवण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. त्यानंतर सैनिकांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार तणाव वाढल्यानं पुन्हा एकदा या महामार्गावर स्थानिक अधिकाऱ्यांकडून कर्फ्यू लावण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर अशांत आहे. हिसांचाराच्या घटना घडत आहेत. याचदरम्यान एक मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा निर्णय घेतला. मणिपूरचा सुरक्षा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीत त्यांनी मणिपूरच्या सर्व प्रमुख माहामार्गांवरून होणाऱ्या वाहतुकीवरील निर्बंध उठवण्याचे आदेश दिले. जर कोणी अडथळा निर्माण केला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करा असे आदेश देखील त्यांनी दिले होते. (Manipur Violence)
हेही वाचा-Sambhal मध्ये दंगलखोरांनी फेकलेल्या दगडांपासून ३८ पोलीस चौक्यांचा पाया बांधला जातोय
या आदेशानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलानं राज्य प्रशासनाच्या मदतीनं आठ मार्चपासून मुक्त वाहतूक सुरू केली. मात्र त्याचवेळी पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. कुकी समुदायानं केलेल्या दगडफेकीमध्ये सीआपीएफचे तब्बल 27 जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या लोकांचा मुक्त वाहतुकीला विरोध आहे. (Manipur Violence)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community