सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर ‘या’ कारणामुळं कोसळलं!

संरक्षणमंत्र्यांना सादर केलेल्या तपास अहवालात खुलासे

तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत हवाई दलाने आपला अहवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सादर केला आहे. या अहवालात अनेक महत्त्वाचे मोठे खुलासे समोर आले आहे. 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 लष्करी अधिकारी ठार झाले. या अपघाताची तिन्ही दलांच्या संयुक्त समितीने चौकशी केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती संरक्षणमंत्र्यांना देण्यात आली आहे.

‘या’ कारणामुळं हेलिकॉप्टर क्रॅश

त्रिस्तरीय चौकशी समितीने संरक्षणमंत्र्यांना अपघाताच्या कारणाची माहिती दिली आहे. या सोबतच भविष्यात असे अपघात घडू नयेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. भारतीय लष्कराचे अधिकारी एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने या घटनेची चौकशी केली आहे. Mi-17 V5 हेलिकॉप्टर डोंगरात एका रेल्वे रुळाजवळ उड्डाण करत होते. यावेळी अचानक दाट ढगांमध्ये हे हेलिकॉप्टर शिरलं हेलिकॉप्टर कमी उंचीवर उडत असल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर उतरत असताना त्याचवेळी हेलिकॉप्टर एका खडकावर आदळले.

(हेही वाचा – ओमायक्रॉनसाठी काय आहेत नवे होम क्वारंटाईनचे नियम, वाचा…)

चौकशी समितीच्या शिफारशीमध्ये काय म्हटले

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधील संपूर्ण कर्मचारी वर्ग हा मास्टर ग्रीम वर्गातील होता. तो परिस्थिती हाताळून सुखरूप बाहेर पडेल, असा त्यांना विश्वास होता असे दिसते. कारण ग्राउंड स्टेशनवर आणीबाणीची सूचना देण्यासाठी कॉल केले गेले नाहीत. तिन्ही दलांच्या वाहतूक विमान आणि हेलिकॉप्टर फ्लीटमधील सर्वोत्तम वैमानिकांना ग्रीन श्रेणी दिली जाते. हा वैमानिक टेक ऑफ करण्यात तसेच कमी दृश्यमानतेत विमान उडवण्यात पटाईत आहेत. चौकशी समितीच्या शिफारशींमध्ये, हे मान्य करण्यात आले आहे की भविष्यात, क्रूमध्ये मास्टर ग्रीनसह इतर वर्गातील पायलट यांचा समावेश असावा, जेणेकरून ते आवश्यक असल्यास जमिनीवर असलेल्या स्टेशनची मदत घेऊ शकतील. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीने आणखी अनेक सूचना केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here