जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) स्थलांतरित मजुरावर दहशतवाद्यांनी (Terrorist Attack ) गोळ्या झाडल्या. या मजुराचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील पोलिसांनी या घटनेबाबत सोमवारी माहिती दिली.
उत्तर प्रदशातून स्थलांतरित झालेल्या या मजुराचे नाव मुकेश असे आहे. या हत्येबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऑफ-ड्यूटी पोलीस मसरूर अहमद वानी ईदगाह क्रीडांगणावर क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या मैदानावर लष्कर-ए-तोएबाच्या एका दहशतवाद्याने जम्मू-कश्मीर पोलिसावर गोळ्या झाडल्याच्या एक दिवसानंतरच दहशतवाद्यांनी मजुराची हत्या केल्याची घटना घडली. एका दहशतवाद्याने या पोलिसावर जवळून डोळा, पोट आणि मानेवर तीन गोळ्या झाडल्या. वानी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वानी यांच्या हल्ल्यानंतर पुलवामा येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
#WATCH | J&K: Security tightened in Pulwama as terrorists fired upon one labourer in the Tumchi Nowpora area, who later succumbed to his injuries. pic.twitter.com/waq7XVKqfs
— ANI (@ANI) October 30, 2023
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांनी पुलावामा येथील नोपोरा भागात स्थलांतरित मजुरावर हल्ला केला. त्यामुळे श्रीनगरमधील सर्व प्रमुख चौकांवर तसेच शहरातील बाहेर पडण्याच्या ठिकाणी मोबाइल वाहन चौक्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मिर पोलिसांनी Xद्वारे दिली आहे.
सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ एका दहशतवाद्याला ठार करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला तसेच केरन सेक्टरमधील जुमागुंड भागात रविवारी रात्री घुसखोरीचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला. अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community