लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या किमान वयोमर्यादेत बदल; सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता या योजनेत सैन्य भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 23 वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा 21 वर्ष इतकी होती. मात्र, हा बदल केवळ यावर्षासाठीच लागू आहे. पुढच्या वर्षीपासून वयोमर्यादा ही साडे सतरा वर्षे ते 21 वर्षे एवढीच असणार आहे.

मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे लष्कर भरती रखडली आहे. तसेच अग्निपथ योजनेविरोधात देशभरात तीव्र आंदोलने सुरु झाली आहेत. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्र सरकारने या वर्षापूरता वयोमर्यादेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

वयोमर्यादेला विरोध 

विद्यार्थ्यांकडून होणा-या विरोधात एक मुद्दा हा वयोमर्यादेबाबतही होता. सध्या कमाल वयोमर्यादा 21 वर्ष इतकी आहे. मात्र, विरोध पाहता कमाल वयोमर्यादा ही 23 वर्ष करण्यात आली आहे.

( हेही वाचा: पैसे दिले नाही म्हणून सदाभाऊ खोतांना हॉटेल मालकाने रस्त्यातच अडवले! )

सरकारकडून स्पष्टीकरण

अग्निपथ योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही स्पष्टीकरणे दिली आहेत. अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा समाप्तीनंतर व्यवसाय, शिक्षण आणि इतर नोक-या इत्यादींसाठी सरकारकडून मदत दिली जाणार आहे. अग्निवीरला 11.72 लाख रुपयांचे आर्थिक पॅकेज देण्यात येणार आहे. या निधीतून ते काही व्यवसाय करु शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here