Ministry of Defence: संरक्षण मंत्रालयाने खासगी शस्रास्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांना दिला इशारा, वाचा सविस्तर

संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांना एंड यूजर सर्टिफिकेशन (EUC)नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

138
Ministry of Defence: संरक्षण मंत्रालयाने खासगी शस्रास्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांना दिला इशारा, वाचा सविस्तर

संरक्षण मंत्रालय भारतातून उत्पादित आणि निर्यात होणाऱ्या शस्त्रांवर देखरेख वाढवली जात आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, संरक्षण मंत्रालयाने खासगी शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांना इशारा देऊन त्यांची शस्त्रे कोठे पोहोचत आहेत यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

युरेशियन टाईम्सच्या रिपोर्टनुसार, वर्षाच्या सुरुवातीला काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, भारतात बनवलेले १५५ एमएम आर्टिलरी शेल्स युक्रेनमध्ये वापरले जात आहे, तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, भारताकडून युक्रेनला कोणत्याही प्रकारची शस्त्रे पाठवण्यात आलेली नाहीत.

(हेही वाचा – Ajit Pawar: आमदार सुनील टिंगरेंची भूमिका संशयास्पद; अजितदादा म्हणाले…)

भारताने निर्यात केलेली शस्त्रे शेवटी कुठे पोहोचतात?
संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांना एंड यूजर सर्टिफिकेशन (EUC)नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. याद्वारे भारताने निर्यात केलेली शस्त्रे शेवटी कुठे पोहोचतात याची खात्री केली जाते. शस्त्रे यापुढे निर्यात होऊ नयेत हाच हे प्रमाणपत्र देण्यामागचा उद्देश आहे. सध्या युक्रेन, तुर्की, चीन आणि पाकिस्तानला शस्त्रास्त्रे विकणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध आहेत. निवृत्त कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, सरकार चुकीच्या हाताने म्हणजे भारतातून पाठवलेली शस्त्रे त्या संस्था आणि देशांपर्यंत पोहोचत नाहीत, ज्यावर काही प्रकारचे निर्बंध आहेत. यामध्ये विशेषत: इंटरपोल आणि भारत सरकारने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.