Ministry of Defense ने २०२५ हे ‘ सुधारणा वर्ष’ म्हणून केले घोषित

64
Ministry of Defense ने २०२५ हे ' सुधारणा वर्ष' म्हणून केले घोषित
Ministry of Defense ने २०२५ हे ' सुधारणा वर्ष' म्हणून केले घोषित

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense ) 2025 हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत 2025 हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संरक्षण मंत्रालय 2025मध्ये सायबर आणि स्पेस सारख्या नवीन क्षेत्रांवर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

(हेही वाचा : Daryapati Shivray : शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense ) म्हटले आहे की, सशस्त्र दलांना बहु-डोमेन इंटिग्रेटेड ऑपरेशन्स (Multi-domain integrated operations) करण्यास सक्षम असलेल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि लढाऊ-तयार दलामध्ये बदलण्यासाठी सुधारणा उपाय लागू केले जातील. मंत्रालयाने सांगितले की 2025 मध्ये सायबर आणि स्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, हायपरसोनिक्स आणि रोबोटिक्स सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जाईल.(Ministry of Defense )

यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले की, सुधारणांचे वर्ष हे सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल असेल. यामुळे देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये अभूतपूर्व प्रगतीचा पाया घातला जाईल आणि अशा प्रकारे 21व्या शतकातील आव्हानांमध्ये राष्ट्राची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करण्याची तयारी होईल. दरम्यान संरक्षण सुधारणांमुळे एकसंध लष्करी कमांड स्थापन करणे सुलभ होईल, असे देखील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सांगितले. (Ministry of Defense )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.