आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्याकरिता, संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) Su-30MKI विमानांसाठी 240 AL-31FP एअरो इंजिनसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) बरोबर 26,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि एचएएल च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
(हेही वाचा – Ajit Pawar चुका मान्य करू लागलेत; पवारांचे नक्की चालले तरी काय?)
एचएएलच्या कोरापुट विभागाद्वारे ही एअरो इंजिन तयार केली जातील आणि देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी Su-30 ताफ्याची परिचालन क्षमता कायम राखण्याची भारतीय हवाई दलाची गरज पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. करारातील वितरण वेळापत्रकानुसार एचएएल दरवर्षी 30 एअरो -इंजिन्सचा पुरवठा करेल. सर्व 240 इंजिनांचा पुरवठा पुढील आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल. (Defense Ministry)
(हेही वाचा – Chief Minister पदासाठी उद्धव ठाकरेंचे काँग्रेस-राष्ट्रवादीत फुट पाडण्याचे प्रयत्न?)
निर्मिती दरम्यान, एमएसएमई आणि सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांचा समावेश असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेची मदत घेण्याचा एचएएलचा विचार आहे.वितरण कार्यक्रमाच्या समाप्तीपर्यंत, एचएएल स्वदेशी सामग्री 63% पर्यंत वाढवून सरासरी 54% पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करेल. यामुळे एअरो इंजिनांच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमधील स्वदेशी सामग्री वाढवण्यात देखील मदत होईल. (Defense Ministry)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community