CAPF कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ‘सीएपीएफ पुनर्वास’ योजना

105

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफलच्या निवृत्त जवानांना खाजगी सुरक्षा संस्थांमधे रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने, गृह मंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार कल्याण आणि पुनर्वसन मंडळाच्या (डब्लूएआरबी) माध्यमातून ‘सीएपीएफ पुनर्वास’ योजना सुरू केली आहे. नव्याने रोजगार शोधत असलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांना त्यांची वैयक्तिक माहिती कौशल्याचे क्षेत्र आणि पसंतीच्या रोजगार स्थानासह डब्लूएआरबी संकेतस्थळावर नोंदवावे लागतील. त्यानुसार योग्य रोजगार शोधण्यात पोर्टल त्यांना मदत करेल.

गृहमंत्रालय, खाजगी सुरक्षा संस्थांच्या (पीएसएएस) नोंदणीसाठी, खाजगी सुरक्षा संस्था नियमन कायद्या (पीएसएआरए) अंतर्गत एक पोर्टल देखील चालवते. सीएपीएफ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. दोन्ही संकेतस्थळे आता एकमेकांशी जोडली गेली आहेत. याद्वारे ‘सीएपीएफ पुनर्वास’ वर अर्ज केलेल्या सीएपीएफच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांचा तपशील पीएसएआरए संकेतस्थळाच्या माध्यमातून पीएसएद्वारे मिळवला जाऊ शकतो. परिणामी नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे, दोघांसाठी एकच मंच उपलब्ध झाला आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्र मिलिट्री स्कूल परीसरातील जंगलात भीषण वणवा, वन्यजीव सृष्टची हानी)

गृह मंत्रालयाचा हा नवीन उपक्रम पीएसएला ‘सीएपीएफ पुनर्वास’ अंतर्गतचा तपशील डिजिटल पद्धतीने प्रदान करतो. हा उपक्रम सीएपीएफ कर्मचार्यांच्या कल्याणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल असून त्यांच्या पुनर्वसनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दीर्घकाळ चालेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.