संपूर्ण भारतीय बनावट असलेल्या INS Imphal ची चाचणी यशस्वी झाली आहे. INS Imphal ने समुद्रात केलेल्या पहिल्या ब्रह्मोसच्या गोळीबारात लक्ष्यावर अचूकपणे हल्ला केला. नौदलाच्या भाषेत याला ‘बुल्स आय’ स्कोर असे म्हटले जाते.
आयएनएस इंफाळ हे जहाज पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी प्रथमच विस्तारित पल्ल्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. ‘अशा प्रकारच्या सरावामुळे नौदल कोणत्याही परिस्थितीत लढण्यास तयार असल्याचा संदेश देते”, असे नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(हेही वाचा – Myanmar : म्यानमारमध्ये प्रवास टाळा, भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)
‘आत्मनिर्भर भारत’च्या योजनेमुळे जहाज बांधणीची वाढती क्षमता देखील वाढली आहे. INS Imphalला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने स्वदेशी शस्त्रे आणि प्लॅटफॉर्मची विश्वासार्हता दिसून येते.
देशातील सर्वांत मोठी युद्धनौका
स्वदेशी स्टील डी.एम.आर. 249 ए वापरून हे जहाज बांधण्यात आले आहे. आयएनएस इंफाळ 164 मीटर लांबीचे आहे. इंफाळ हे जहाज भारतातील सर्वांत मोठ्या युद्धनौकांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
(हेही वाचा – UGC NET New Syllabus: यूजीसी-नेटच्या अभ्यासक्रमात बदल होणार, अभ्यासक्रम बदलण्यासाठी तज्ज्ञांची समिती)
क्षेपणास्त्रांनी सुसज्ज
क्षेपणास्त्रांनी सुसज्ज INS Imphal जहाजाच्या क्षमतेबद्दल नौदलाने सांगितले की, ते पृष्ठभागापासून पृष्ठभागावर सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागापासून हवेत मारा करणाऱ्या ‘बराक-8’ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. पाण्याच्या आतमध्ये युद्ध करण्यासाठीही ही युद्धनौका सक्षम आहे.
Imphal (Yard 12706), Indian Navy’s latest indigenous guided missile destroyer, scored ‘Bulls Eye’ in her maiden #Brahmos firing at sea.#Imphal #InvincibleImphal@DefMinIndia@AjaybhattBJP4UK@SpokespersonMoD@indiannavy@IndiannavyMedia@DefPROMumbai@IN_WesternFleet pic.twitter.com/uQ42nhEAWt
— Western Naval Command (@IN_WNC) November 22, 2023
स्वदेशी साहित्याचा वापर
INS Imphal च्या निर्मितीत ७५ टक्के स्वदेशी साहित्य वापरण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही क्षेपणास्त्रांची निर्मिती भारतात झाली आहे. स्वदेशी टॉरपीडो ट्यूब लॉन्चर आणि पाणबुडी रोधक रॉकेट लॉन्चर हे दोन्ही लार्सन ॲण्ड टुब्रोने तयार केली आहे. ७६ मिलीमीटर सुपर रॅपिड गन माऊंट ही बीएचईएल, हरिद्वारमध्ये तयार झाली आहे.
(हेही वाचा – ICC: ट्रान्सजेंडर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘नो एन्ट्री’; ICCकडून महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर)
सहा महिन्यांत बांधणी
१९ मे २०१७ मध्ये या युद्धनौकेची निर्मिती सुरू झाली आहे. २० एप्रिल २०१९ मध्ये पहिल्यांदा समुद्रात उतरवण्यात आले होते. २८ एप्रिल २०२३ मध्ये पहिल्या समुद्र परीक्षणासाठी रवाना झाली. आतापर्यंत अनेक चाचण्यांतून युद्धनौका गेली आहे. केवळ सहा महिन्यांत INS Imphal नौका नौसेनेला सोपवण्यात आली आहे.
हेही पहा –