मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे २४ फेब्रुवारीपासून ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ सुरु होणार आहे. या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्त्वाचा सहभाग आहे. प्रदर्शनातील विविध सत्रांत भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार आहे. (MSME Defense Expo)
(हेही वाचा – Goda Aarti : गंगा आरतीप्रमाणेच आता होणार गोदा आरती; शासनाने दिला ‘इतका’ निधी)
उद्योगमंत्र्यांनी केली सिद्धतेची पाहणी
उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी १८ फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाच्या सिद्धतेची पाहणी केली. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वांत मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ला महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन सामंत यांनी या वेळी केले.
या वेळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, गणेश निबे, किशोर धारिया, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन वानखेडे आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Bribery In Railway : लाचखोरी प्रकरणी सीबीआयने रेल्वेच्या तीन अभियंत्यांसह चौघांना घेतले ताब्यात)
संरक्षण अभियांत्रिकी उद्योगांनाही प्रदर्शनात सहभागी करून घेणार
सामंत म्हणाले, ”शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांविषयी कुतूहल असते. त्यांना आधुनिक शास्त्रासोबत संरक्षण साहित्य जवळून पहाण्याची ही संधी आहे. संरक्षण अभियांत्रिकी उद्योगांनाही प्रदर्शनात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या क्षेत्राशी संबंधित स्टार्ट अप्स आणि इतर उद्योगांना उद्योग विस्तार आणि या क्षेत्रातील संधीविषयी प्रदर्शनातून माहिती मिळणार असल्याने उद्योग क्षेत्राशी निगडित प्रतिनिधींनी प्रदर्शनात सहभागी व्हावे.”
प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या एमएसएमईना निःशुल्क दालन उपलब्ध करून द्यावे. सर्व उद्योग संघटनांच्या बैठका घेऊन त्यांना आमंत्रित करावे, असे निर्देश सामंत त्यांनी दिले.
प्रदर्शनातील चार दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी विशेष माहिती या वेळी देण्यात आली. (MSME Defense Expo)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community