Indian Navy ची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ला MTDC खाडीत बुडवणार; कारण…

ही युद्धनौका आतापर्यंत भारतीय नौदलाच्या Indian Navy अंदमान-निकोबार कमांडच्या ताब्यात होती. आता ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) च्या स्वाधीन करण्यात आली आहे.

89

‘आयएनएस गुलदार’ लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल आणि शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल. स्वच्छतेनंतर, ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल. समुद्राच्या पाण्याखाली असलेल्या या युद्धनौकेचे प्रमाणित स्कुबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे. ज्यांना स्कुबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी MTDC तीन ते चार पाणबुड्या विकत घेणार आहे. मालवणच्या वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची Indian Navy निवृत्त युद्धनौका MTDC ने मागितली होती.

भारतीय नौदलात Indian Navy चाळीस वर्षे सागरी सेवा दिलेल्या या युद्धनौकेला भारतीय नौदलाने कारवार नौदल तळ, जिल्हा उत्तर कानडा येथे MTDC कडे सोमवार, २४ फेब्रुवारीला हस्तांतरित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या विजयदुर्ग खाडीत ही युद्धनौका बुडवण्यात येणार असून पर्यटकांना समुद्राच्या आतून पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे MTDC व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयासोबत पाठपुरावा करुन हा प्रकल्प पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनविकास मंत्री शभुराजे देसाई, राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले. मराठ्यांच्या अधिसत्यात तब्बल 105 वर्षे राहिलेल्या किल्ले विजयदुर्गचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊनच हा प्रकल्प येथे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा Women’s Day ला पंतप्रधानांचे सोशल मिडिया खाते महिला हाताळणार; महिलांचा अनोखा सन्मान)

विजयदुर्ग किल्ला आणि ऐतिहासिक महत्त्व

105 वर्षे मराठ्यांच्या अधिसत्यात असलेला किल्ले विजयदुर्ग आणि त्याचे आरमारी साम्राज्य इतिहासाच्या पानावर अधोरेखित आहे. त्यामुळे हा प्रकल्प विजयदुर्गाच्या समुद्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 23 राज्यांमधील 40 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देत त्यासाठी निधी जाहीर केला होता. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्टिफिशियल रीफ आणि अंडरवॉटर म्युझियमचाही समावेश आहे. युद्धनौकेचे गौरवशाली कार्य: भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ ही सागरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन सेवा निवृत्त झाली आहे. 12 जानेवारी रोजी, चार दशकांच्या गौरवशाली सेवेनंतर तिला नौदलातून कार्यमुक्त करण्यात आले. आपल्या सेवा काळात या जहाजाने अनेक सुरक्षा मोहिमा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे.

ही युद्धनौका आतापर्यंत भारतीय नौदलाच्या Indian Navy अंदमान-निकोबार कमांडच्या ताब्यात होती. आता ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) च्या स्वाधीन करण्यात आली आहे. युद्धनौकेच्या हस्तांतरणासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने, केंद्रीय पर्यटन विभागासोबतच नौदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गेले काही महिने प्रयत्न केले होते. युद्धनौका विजयदुर्ग बंदर येथे आणली जाईल, स्वच्छ केली जाईल आणि नंतर समुद्रात बुडवण्यात येईल. विजयदुर्ग परिसरात पर्यटकांना समुद्राखाली तिचे दर्शन घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे विजयदुर्ग परिसरात अधिकाधिक पर्यटक आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

विजयदुर्ग परिसरात हा प्रकल्प का?

सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे आरमार बांधणीचा कारखाना उभारला होता. यामध्ये आरमारी युद्धनीतीसाठी महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा असंख्य यांसारख्या असंख्य प्रकारच्या युद्धनौका बांधल्या जात होत्या. या आरमारासाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघवटं खाडी निश्चित करण्यात आली होती. ही खाडी सुमारे 42 किलोमीटर लांब आणि 40-50 मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ-वाऱ्यांपासून नौकांसाठी सुरक्षित मानली जात असे. तसेच आरमारी गनिमी काव्यासाठीही हे मोक्याचे ठिकाण होते.

मराठ्यांच्या अधिसत्यात तब्बल 105 वर्षे राहिलेल्या किल्ले विजयदुर्गचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊनच मालवणच्या वेंगुर्ला जवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार ताब्यात घेऊन  हा प्रकल्प येथे राबवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.