Mumbai Terrorist Attack: २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मृत्यूच्या दारात, पाकिस्तानच्या तुरुंगात विषबाधा

साजिद मीर याला पाकिस्तानातील डेरा गाजी खानच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

261
Mumbai Terrorist Attack: २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मृत्यूच्या दारात, पाकिस्तानच्या तुरुंगात विषबाधा
Mumbai Terrorist Attack: २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मृत्यूच्या दारात, पाकिस्तानच्या तुरुंगात विषबाधा

मुंबईवर २६\११ ला दहशतवादी हल्ला करून निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी साजिद मीर या दहशतवाद्यावर विष प्रयोग झाला आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा सक्रीय सदस्य असून मुंबईवरील (Mumbai Terrorist Attack) हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.

विषप्रयोगानंतर साजिद मीरची प्रकृती नाजूक असून सध्यो तो व्हेंटिलेटरवर असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचं वृत्त सांगितलं जात असलं तरीही पाकनेच हे विषप्रयोगाचं नाटक रचल्याची शंका भारतीय तपास यंत्रणांनी घेतली आहे, अशी माहितीही समोर येत आहे.

(हेही वाचा – I.N.D.I. Alliance: बैठकीवरच एकमत नाही, ‘इंडिया आघाडी’ची बैठक पुढे ढकलली)

विषप्रयोगामुळे प्रकृती बिघडल्यानंतर दहशतवादी मीरला एअरलिफ्ट करून बहावलपूर येथील सीएमएच इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. साजिद मीर याला पाकिस्तानातील डेरा गाजी खानच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथेच त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचंही सांगण्यात येत आहे, मात्र याबाबत पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उघडकीस आलेली नाही.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर साजिद मीरने आपला चेहरा बदलल्याचा दावा एफबीआयकूडून करण्यात आला होता. त्याने अनेकदा आपल्या नावात बदल केला आहे. या दहशतवाद्याने त्याची ओळख पटू नये यासाठी प्लास्टिक सर्जरी करून त्याच्या चेहऱ्यात बदल केल्याचीही चर्चा होती.

आचाऱ्याकडूनच विषबाधेचा संशय…
आय. एस. आय. ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे. पाकिस्तानी लष्कराने साजिद मीरला बहावलपूर येथील केंद्रीय लष्करी रुग्णालयात उपचारासाठी विमानाने पाठवले होते. तिथे या दहशतवाद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. दहशतवाद्यांसाठी अन्न तयार करण्यासाठी तुरुंगात आचारी ठेवण्यात आले होते. तो आचारी या दहशतवाद्याला रोज स्वयंपाक करून खायला घालत असे. आचारी रोज यायचा आणि जायचा, मात्र साजिद मीरला विषबाधा झाल्यानंतर तो फरार झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवत आहे. त्यामुळे स्वयंपाकीने दहशतवादी साजिद मीरला विष दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.