म्यानमार (Myanmar Earthquake ) आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तीशाली भूकंपामुळे मोठा विध्वंस होत आहे. आतापर्यंत भूकंपबळींची संख्या १६४४ वर पोहोचली आहे. भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ३४०८ नागरिक जखमी झाले आहेत, तर १३९ जण बेपत्ता आहेत. (Myanmar Earthquake )
हेही वाचा-“विकासाची महागुढी उभारू या…” ; CM Devendra Fadnavis यांच्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
अधिकृत आकडेवारी आणखी जमा केली जात आहे. भूकंपामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. मृतांचा आकडा मोठा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्यानमारमध्ये दीर्घकाळापासून नागरी संघर्ष सुरू असून, त्यामुळे अनेक समस्या येथे तयार झाल्या आहेत. (Myanmar Earthquake )
‘ऑपरेशन ब्रह्म’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्यानमारमधील लष्करशाही राजवटीचे प्रमुख जनरल मिन आँग लेंग यांच्याशी चर्चा केली. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा सामना करण्यामध्ये भारत म्यानमारबरोबर असल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी ‘एक्स’वर ही माहिती दिली. मोदी म्हणाले, ‘म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांबदद्लच्या वेदना जनरल लेंग यांच्याकडे व्यक्त केल्या. जवळचा मित्रदेश आणि शेजारी देश म्हणून म्यानमारमधील नागरिकांबरोबर भारत आहे. भारताने मदतीचे साहित्य आणि पथक म्यानमारला रवाना केले आहे.’ भारताने शनिवारी म्यानमारमध्ये ‘ऑपरेशन ब्रह्म’अंतर्गत १५ टन बचावसाहित्य म्यानमारला रवाना केले. (Myanmar Earthquake )
जगभरातून मदत
चीनच्या युनान भागातून यांगून येथे शनिवारी ३७ जणांचे पथक आले. याखेरीज बीजिंग येथून ८२ जणांचे पथक येणार आहे. १६ जणांचे आपत्कालीन पथकही मदतीसाठी पाठविण्यात आले आहे. रशियाची आणीबाणी काळातील १२० जणांची पथके दोन विमानांनी म्यानमारला रवाना झाली आहेत. मलेशियातून ५० जण रविवारी मदतीसाठी येणार आहेत. दक्षिण कोरियाने २० लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ५० लाख डॉलरची मदत दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. (Myanmar Earthquake )