NASA ने पृथ्वीसाठी दिला धोक्याचा इशारा; काय आहे कारण ?

60
NASA ने पृथ्वीसाठी दिला धोक्याचा इशारा; काय आहे कारण ?
NASA ने पृथ्वीसाठी दिला धोक्याचा इशारा; काय आहे कारण ?

भूतकाळात पृथ्वीवर (Earth) अनेकदा लघुग्रह (Astroid) कोसळले असून, त्याचे परिणाम विनाशकारी ठरले आहेत. 1908 मध्ये रशियाच्या सायबेरियन भागात कोसळलेल्या एका मोठ्या लघुग्रहाने जवळपास 2000 चौरस किलोमीटर क्षेत्र नष्ट केले होते. सुदैवाने, सायबेरियाच्या या भागात विरळ वस्ती होती यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो झाडे आणि वनस्पती जळून खाक झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा शास्त्रज्ञांनी अशाच एका लगुग्रहाचा धोकादायक इशारा दिला आहे. (NASA)

लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास विनाश निश्चित
लवकरच एक ॲस्ट्रॉईड पृथ्वीजवळून जाणार आहे, असं नासाने सांगितलं आहे. हा लघुग्रह (Astroid) पृथ्वीवर आदळला तर पृथ्वीचा विनाश होईल. पृथ्वीसाठी लघुग्रहांना नेहमीच धोकादायक मानले जातात. शास्त्रज्ञांच्या मते, जर एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास विनाश निश्चित आहे. काही हजार दशलक्ष वर्षांपूर्वी, जेव्हा एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला, तेव्हा पृथ्वीवरून सर्व डायनासोर नष्ट झाले होते. (NASA)

2024 YR4 क्षुद्रग्रहाचे स्वरूप आणि धोका
पुन्हा एकदा नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर एक मोठा लघुग्रह आदळण्याचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला 2024 YR4 असं नाव दिलं आहे. हा लघुग्रह 27 डिसेंबर 2024 रोजी लघुग्रह स्थलीय प्रभाव शेवटच्या सूचना प्रणाली (ATLAS) द्वारे पाहण्यात आला. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या सेंटर फॉर निअर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 YR4 हा लघुग्रह 2032 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल. 22 डिसेंबर 2032 रोजी हा लघुग्रह पृथ्वीपासून फक्त 106,200 किलोमीटर अंतरावर असेल. या YR4 लघुग्रहाच्या कक्षेत थोडासाही बदल झाला तर, तो पृथ्वीवर आदळू शकतो. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास भयंकर विनाश होऊ शकतो. (NASA)

पृथ्वीच्या संरक्षणासाठी उपाययोजना
नासासह (NASA) विविध जागतिक संस्था अशा संकटांना टाळण्यासाठी संरक्षणात्मक उपाय शोधत आहेत. भविष्यात जर हा लघुग्रह खरोखरच धोकादायक ठरला, तर त्याचा मार्ग बदलण्यासाठी किंवा त्याला नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले जाईल अशा अपेक्षा आहे. अद्याप याबाबत निश्चित निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, भविष्यात अशा आपत्तींपासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी विज्ञान मोठी भूमिका बजावणार आहे. (NASA)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.