Nashik News: नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये फायरिंगचा सराव करताना स्फोट; दोन अग्निवीरांचा मृत्यू

200
Nashik News: नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये फायरिंगचा सराव करताना स्फोट; दोन अग्निवीरांचा मृत्यू
Nashik News: नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये फायरिंगचा सराव करताना स्फोट; दोन अग्निवीरांचा मृत्यू

नाशिकच्या (Nashik News) आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) स्फोट (Blast) झाल्याने दोन अग्निवीरांचा (Agniveer) मृत्यू झाला आहे. सरावावेळी फायरिंग करत असताना स्फोट झाल्याने अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जाते. आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीरांचा सराव सुरु होता. आर्टिलरी फायरिंग रेंजमध्ये ‘आयएफजी इंडियन फिल्ड गन’ने फायरिंग सुरु होती. याच प्रशिक्षणादरम्यान फायरिंग करत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे आर्टिलरी सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. (Nashik News)

(हेही वाचा-१० मिनिटांत Ajit Pawar मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का निघून गेले? कारण आलं समोर)

गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे या अग्निवीरांचे नाव आहे. भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. याअंतर्गत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मागील वर्षी दाखल झाले होते. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात 25 हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती करण्यात आले. (Nashik News)

(हेही वाचा-Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! परतीच्या पावसाचा जोर वाढणार, १४ जिल्ह्यांना अलर्ट)

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर २१ तोफांची सलामी दिली जाते. आता भारतीय बनावटीच्या ‘इंडियन फील्ड गन’चा वापर करण्यात येतो. इंडियन फील्ड गनचे तीन प्रकारचे मॉडेल आहेत, यामध्ये MK-1, MK-2 आणि ट्रक माउंटेड असे आहेत. वजनाने हलकी असलेली तोफ तीन तुकड्यांमध्ये कुठेही नेणे शक्य होते. (Nashik News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.