पृथ्वी-2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आहे आणि लक्ष्यावर अचूक मारा करण्यास सक्षम आहे.
या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालन आणि तांत्रिक मापदंडांची यशस्वी पडताळणी करण्यात आली.
( हेही वाचा: आता कितीही वेळा देता येईल MPSC परीक्षा! )
300 किमी एवढी मारक क्षमता
यापूर्वीही, ओडिशातली बालासोर किना-यावर या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणीही यशस्वी ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. पृथ्वी-2 हे एक स्वदेशी बनावटीचे आण्विक दृष्ट्या सक्षम असे मिसाईल आहे. या मिसाईलची मारक क्षमता 350 किमी एवढी आहे. एवढेच नाही, तर हे मिसाईल वाॅरहेड्स वाहून नेण्यासही सक्षम आहे. तसेच, या मिसाईलला दोन इंजिन आहेत.