ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर, भारताची जगात केवळ सापांचा देश अशी ओळख होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, विकासाच्या दिशेने वाटचाल करु लागला. 11 मे 1998 रोजी भारताने तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती करत पोखरण येथे पहिली यशस्वी अणुचाचणी केली अन् आधी केवळ सापांचा देश म्हणून ओळख असणा-भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली. 11 मे 1998 च्या या सुवर्ण कामगिरीचा इतिहास जाणून घेऊया.
…आणि भारत युक्लियर क्लब मध्ये सामिल झाला
1998 साली आजच्याच दिवशी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रझानातील प्रगती जगाला दिसू लागली. पोखरण अणुचाचणी तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतीक म्हणून हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पडली.
दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II/ ऑपरेशन शक्ती पुढाकाराचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत ‘युक्लियर क्लब’ मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नाॅन- प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.
( हेही वाचा: मुंबईत २४ तास धावणाऱ्या लोकलची ‘अशी’ होते देखभाल )
त्रिशूल क्षेपणास्त्राचा लष्करात समावेश
एवढ्यावरच भारत थांबला नाही, तर 11 मे 1998 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO ) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली. त्यानंतर, भारतीय लष्कर आणि वायुसेनेत त्रिशूल समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरुन हवेत मारा करणारे त्रिशूल या क्षेपणास्त्राच्या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला.
Join Our WhatsApp Community