नौदल कमांडर्स परिषदेचे INS विक्रांतवर आयोजन! ६ मार्चला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संबोधित करणार

नौदल कमांडर्स परिषद 2023 च्या पहिल्या टप्प्याला 6 मार्च रोजी सुरूवात होणार आहे. ही परिषद नौदल कमांडर्ससाठी लष्करी सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी संस्थात्मक स्तरावर संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.

( हेही वाचा : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका! बुलढाणा, नंदूरबारसह धुळ्यात जोरदार पावसाला सुरूवात)

नौदल कमांडर्स कॉन्फरन्सचा पहिला टप्पा समुद्रात आयोजित करण्यात आला असून या वर्षीच्या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत जहाजावर ही परिषद होणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आयएनएस विक्रांतच्या नौदल कमांडर्सना संबोधित करतील. संरक्षण कर्मचारी प्रमुख आणि भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल प्रमुख पुढचे काही दिवस नौदल कमांडर्सशी संवाद साधतील. परिषदेदरम्यान, नौदल कमांडर्सना 22 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘अग्निपथ योजने’बाबत अध्ययावत माहिती सुद्धा दिली जाईल.

भारताच्या वाढत्या सागरी हितसंबंधांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये नौदलाने आपल्या मोहिमांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. भारतीय नौदल युद्धतत्पर, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यकालीन समस्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत असून देशाच्या सागरी सुरक्षेची हमी वाहणारा या नात्याने आपल्या कटिबद्धतेचं कर्तव्यदक्षतेने पालन करत आहे. अशा अनेक विषयांवर या परिषदेदरम्यान चर्चा केली जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here