भारत आणि जपान या दोन्ही देशांच्या नौदलांच्या ‘जीमेक्स-२४’ या सागरी सरावाला जपानमध्ये नुकतीच सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने भारतीय नौदलाचे स्वदेशी ‘फ्रिगेट आयएनएस शिवालिक’ ही युद्धनौका जपानमधील योकोसुका येथे दाखल झाली आहे. या द्वीपक्षीय सरावाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये विविध युद्धनीतींचा सराव, त्याचबरोबर सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त कौशल्यांचे देवाणघेवाण होणार आहे. (Naval Maritime Exercises)
भारत आणि जपान या देशांच्या नौदलांमध्ये होणाऱ्या ‘जीमेक्स’ या सरावाची यंदा आठवी आवृत्ती असून, याची पहिली आवृत्ती २०१२ मध्ये झाली होती. या सरावामध्ये बंदर (हार्बर) आणि सागरी दोन्ही टप्प्यांचा समावेश असेल. हार्बर टप्प्यात व्यावसायिक, क्रीडा आणि सामाजिक संवादांचा समावेश असेल, तर सागरी टप्प्यात दोन्ही नौदल संयुक्तपणे समुद्रात त्यांचे युद्धकौशल्य सादर करतील. त्याचबरोबर हवाई क्षेत्रातील जटिल ऑपरेशन्सद्वारे त्यांची आंतरकार्यक्षमता वाढविण्यासाठी सराव करतील. (Naval Maritime Exercises)
(हेही वाचा – Pune Porsche Car Accident: बाळाची बालसुधारगृहातील कोठडी वाढली, १८ जूनपर्यंत मुक्काम)
सागरी सुरक्षेसाठी…
सागरी सुरक्षेच्या वाढत्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता ‘जीमेक्स-२४’ सराव दोन्ही देशांच्या नौदलांना एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धतींमधून शिकण्याची संधी प्रदान करते व इंडो-पॅसिफिकमधील सागरी सुरक्षेसाठी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी मदत करते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community