नौदलाने Rafale खरेदीसाठी फ्रान्ससोबत ६४ हजार कोटींची डील केली आहे. राफेल खरेदीत झालेल्या घोटाळ्यामुळे ही डील वादग्रस्त ठरली होती. तरीही मोदी सरकारने यातील त्रुटी दूर करून ही डील पूर्ण करत भारताचे संरक्षण भक्कम करण्याकडे पाऊल टाकले होते. आता नौदलाला देखील राफेलची ताकद देण्यासाठी पुढे पाऊल टाकले आहे.
(हेही वाचा Waqf Law 2013 ने धर्मांध मुस्लिम आणि भूमाफियांना बळकटी मिळाली; पंतप्रधान मोदींचा आरोप)
भारत सरकार नौदलासाठी सक्षम असलेली २६ राफेल (Rafale) लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यासाठी ६४ हजार कोटींची डील मंजूर करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेटने ही मंजुरी दिली आहे. ही विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाणार आहेत. एक पायलट असलेली २२ विमाने आणि दोन सीट असलेली चार विमाने यात असणार आहेत. येत्या काही दिवसांत या करारावर हस्ताक्षर होणार आहेत. या डीलमध्ये केवळ विमानेच नाहीत तर त्यांना लागणारी शस्त्रे, स्टिमुलेटर, झुलत्या जहाजांवर उतरण्यासाठी लागणारी यंत्रणा आदी गोष्टींचा समावेश असणार आहे. यामध्ये पायलट ट्रेनिंग आणि लॉजिस्टिक सपोर्टदेखील असणार आहे. (Rafale)
Join Our WhatsApp Community