छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नक्षलग्रस्त बिजापूर (Bijapur) जिल्ह्यातील कुटरू मार्गावर बेदरे येथे जवानांच्या गाडीवर दि. ६ जानेवारी रोजी नक्षलवाद्यांना भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुदरराज. पी (Sudarraj. P) यांनी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती दिली.
( हेही वाचा : Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
दि. ६ जानेवारी रोजी सकाळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा विस्फोट करून जवानांचे वाहन उडवले. यामध्ये ९ जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. नारायणपूरमधील (Narayanpur) चकमकीनंतर चार दिवसांनी जवान जंगलातून परतत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला.
गाडीत सुमारे २० जवान
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांच्या वाहनात २० जण होते. अपघाताची माहिती मिळताच विजापूरचे एसपी जितेंद्र यादव (Jitendra Yadav) घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमी जवानांना तिथून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले आहेत.