Naxalite Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; 4 नक्षलवादी ठार, 1 जवान हुतात्मा

161

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमदच्या जंगलात शनिवारी रात्री उशिरापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ जानेवारीला नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त पथके अबुझमद भागासाठी रवाना झाली होती. ४ जानेवारीच्या संध्याकाळी अबुझमदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी मधूनमधून गोळीबार सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ४ नक्षलांचा खात्मा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच या कारवाईत DRG चा एक जवान शहीद झाल्याचीही माहिती समोर आली आहे. (Naxalite Attack)

बस्तर रेंजचे (Bastar Range) पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, जंगलात शोध मोहिमेदरम्यान आतापर्यंत ४ गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्याकडून एके ४७ आणि एसएलआर सारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांशी (Naxalite) झालेल्या चकमकीत दंतेवाडा डीआरजी जवान हेड कॉन्स्टेबल सन्नू करम (Shahid Sannu Karam) हे शहीद झाले. सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि बस्तर जिल्ह्यातील 1 हजार DRG आणि STF जवानांनी शनिवारी नक्षलवाद्यांच्या मुख्य भागाला वेढा घातला होता. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. जवान अजूनही घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान, या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक (DRG) चे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम देखील शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Expensive Car : मुंबईकरांनी सरत्या वर्षात केला महागड्या कारचा विक्रम; 1400 वाहनांची नोंदणी)

गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कालावधीत 300 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत, सुमारे 1000 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्य 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. छत्तीसगड पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शौर्याचे कौतुक केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.