Naxalites in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये १ नक्षलवादी ठार, मृतदेह आणि शस्रे जप्त; केंद्रीय समितीचे सदस्य सरकारला पत्र लिहून म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

126
Naxalites in Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये १ नक्षलवादी ठार, मृतदेह आणि शस्रे जप्त; केंद्रीय समितीचे सदस्य सरकारला पत्र लिहून म्हणाले...

सुकमा जिल्ह्यातील कोंटा येथील किद्रेलपाड भागात डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जवांनाकडून ठार झालेल्या एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. (Naxalites in Chhattisgarh)

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत अनेक नक्षलवाद्यांना गोळ्या घालण्यात आल्या. एसपी किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांनी रविवारी, (२६ मे) बंदची हाक दिली आहे. याआधीही सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. डीआरजी टीम शोधासाठी जंगलात निघाली होती. दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.जवानांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यानंतर ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणाहून अधूनमधून गोळीबार करत राहिले.

(हेही वाचा – Dilip Joshi : सर्वांचे लाडके जेठालाल आहेत तरी कोण?)

२३ मे रोजी ८ नक्षलवादी मारले गेले होते 
छत्तीसगडमध्ये गुरुवारी, (२३ मे) अबुझमदच्या रेकावाया भागात दलाने ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. नक्षलवाद्यांची प्लाटून क्रमांक १६ आणि इंद्रावती एरिया कमिटीचे नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली. जवानांना नक्षलवाद्यांचे नेमके ठिकाण सापडले. त्यानंतर परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा या तीन जिल्ह्यांतील पोलीस कारवाईसाठी तैनात करण्यात आले. (Naxalites in Chhattisgarh)

केंद्रीय समितीच्या सदस्याकडून सरकारला पत्र
त्याचवेळी चकमकीनंतर माओवाद्यांनी सरकारशी चर्चेची तयारी दर्शवली. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्याने सरकारला पत्र लिहिले. या पत्रात रक्तपात थांबवण्यासाठी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे लिहिले होते. (Naxalites in Chhattisgarh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.