महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार (Naxalites killed) झाले. या नक्षलवाद्यांकरिता सरकारने ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने काही नक्षलवादी तेलंगणातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीत घुसले असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी दुपारी मिळाली, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ पथक सी-60 ची अनेक पथके आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे त्वरित कृती पथक परिसरात शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले होते.
(हेही वाचा – Jharkhand : आता झारखंडमध्ये सोरेन कुटुंबात फूट; थोरल्या सुनेने थेट भाजपाचा झेंडा घेतला हाती)
मंगळवारी सकाळी सी-60 युनिटच्या पथकांपैकी एक पथक रेपनपल्लीजवळील कोलामर्का पर्वतांमध्ये शोध घेत असताना, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्याला सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबवल्यानंतर परिसरात शोध घेण्यात आला. तेव्हा ४ पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्यासाठी ३६ लाख रुपयांचे सामूहिक रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
यावेळी एके-47 बंदूक, एक कार्बाइन, दोन देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षली साहित्य आणि इतर वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या तसेच मृत नक्षलवाद्यांची नावे वर्गेश, मॅग्टू, दोन्ही वेगवेगळ्या नक्षल समित्यांचे सचिव आणि प्लाटून सदस्य कुर्संग राजू आणि कुडिमेट्टा व्यंकटेश अशी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –