युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न भारत सरकारकडून केले जात आहेत. तरीही हजाहो विद्यार्थी अद्यापही युक्रेनमध्ये अडकले आहेत. या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत भारत सरकारच्या प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) सहभागी झाले आहे.
विद्यार्थ्यांना मदत
गृह मंत्रालयाच्या निवेदनात नमूद केल्यानुसार, एऩडीआरएफने भारतीय विद्यार्थ्यांसाठी ब्लँकेट, स्लीपिंग मॅट्स आणि सोलर स्टडी लॅम्प इत्यादीसह मदत सामग्री उपलब्ध करून दिली आहे. पोलंडमध्ये बुधवारी सकाळी विमानाने हे मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. तसेच भारतीय वायुसेनेचे आणखी एक विमान गुरुवारी दुपारी रोमानियाला रवाना झाले.
( हेही वाचा: ठरले! एसटीचे सरकारीकरण नव्हे खासगीकरण…)
एनडीआरएफचे मोलाचे योगदान
जपानमध्ये 2011 साली आलेला भूकंप आणि 2015 च्या नेपाळ भूकंपासह भूतकाळातील आपत्तींच्या वेळी लोकांना वाचवण्यासाठी आणि विविध देशांतील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने मोलाचे योगदान दिले होते. यासोबतच एनडीआरएफने गेल्या काही वर्षांत भारतात आणि परदेशात 1.44 लाख लोकांची यशस्वीरित्या सुटका केली आहे आणि 7 लाखांहून अधिक अडकलेल्या लोकांची सुटका केली आहे. एनडीआरएफ चक्रीवादळ, पूर, भूकंप आणि इतर आपत्तींच्या वेळी स्थानिक प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करते.
Join Our WhatsApp Community