महाराष्ट्रात NIA- ATS ची कारवाई! दहशतवादी कृत्यात सहभागी असलेले ३ जण अटकेत

171
NIA ची मोठी कारवाई! देशातील पाच राज्यात २६ ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्रात NIA- ATS मे संयुक्त कारवाई करत जालना व छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवादी कृत्यात या तिघांचा समावेश असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली. तरुणांना ताब्यात घेतलेल्या तीनही घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू असून प्राथमिक माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा यात समावेश आहे. एनआयए आणि एटीएसने (NIA- ATS) महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागातून ती कारवाई करण्यात आली असून जालना व मालेगाव मधूनही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शनिवारी पहाटे एनआयएकडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आलेली आहे. यापूर्वीदेखील महाराष्ट्रातील संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केलेली होती. (NIA- ATS)

माओवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा तपास सुरू
प्राथमिक माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांची याचा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही दोन जिल्ह्यांमधून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा तपास सुरू केला असून महाराष्ट्रातही कारवाई करताना तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (NIA- ATS)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.