Jammu and Kashmir मध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएची ८ ठिकाणी छापेमारी!

63
Jammu and Kashmir मध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएची ८ ठिकाणी छापेमारी!
Jammu and Kashmir मध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएची ८ ठिकाणी छापेमारी!

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) (NIA) आज, गुरुवारी (२१ नोव्हें.) दहशतवादी घुसखोरी प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir ) छापेमारी केली आहे. यावेळी एनआयएने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या मदतीने राज्यात एकाच वेळी 8 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये रियासी, उधमपूर, रामबन, किश्तवाड आणि डोडाचा समावेश आहे.

(हेही वाचा-Mumbai – Pune Expressway वर भीषण अपघात; बसमधील ११ प्रवासी जखमी)

मागील काही दिवसांमध्‍ये राज्‍यात घुसखोरीच्‍या प्रकारात वाढ झाली आहे. त्‍याची गंभीर दखल घेत राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ही कारवाई केली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी ‘एनआयए’ने दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरवल्‍याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद (Sahil Ahmed) याच्‍या घरावर छापा टाकला होता. (Jammu and Kashmir )

(हेही वाचा-Raj Thackeray किंगमेकर ठरणार? मनसेला किती जागा मिळणार ? काय आहे एक्झिट पोल्सचा अंदाज?)

तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्‍या खात्यात 15 लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे आढळले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान (Humayun Khan) नावाच्या फरारी गुन्हेगाराने 15 लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले होते. (Jammu and Kashmir )

(हेही वाचा-स्पॅम कॉल्स आणि एसएमएस रोखण्यासाठी TRAI सतर्क, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई)

साहिल अहमद याचा काका गुलजार अहमद मलिक 1992 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले होते. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानातील सियालकोट येथे राहत होता. एनआयआयएच्या टीमने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांचीही चौकशी केली होती. (Jammu and Kashmir )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.