North Tech Symposium 2023: भारतीय सैन्य दलाकडून नवीन शस्त्राची निर्मिती, स्पायडरमॅनसारख्या दिसणाऱ्या शस्त्राचा समावेश

भविष्यातील युद्ध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जनजागृती

217
North Tech Symposium 2023: भारतीय सैन्य दलाकडून नवीन शस्त्राची निर्मिती, स्पायडरमॅनसारख्या दिसणाऱ्या शस्त्राचा समावेश
North Tech Symposium 2023: भारतीय सैन्य दलाकडून नवीन शस्त्राची निर्मिती, स्पायडरमॅनसारख्या दिसणाऱ्या शस्त्राचा समावेश

भविष्यातील ड्रोन वॉर, ड्रोनच्या समस्या तसेच आव्हाने लक्षात घेता भारतीय सैन्याकडून नवीन शस्त्रे आणि उपकरणे विकसित करण्यात येत असतात. जम्मूमधील ‘नॉर्थ टेक सिम्पोजियम 2023’ मध्ये भारतीय सैन्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने मल्टी युटिलिटी लेग्ज इक्विपमेंट (MULE) विकसित केले आहे.

हे उपकरण दिसायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील स्पायडरमॅनप्रमाणे आहे. म्यूल (MULE) हे एक बहुउद्देशीय उपकरण आहे. यामध्ये अनेक फिचर्स आहेत. IIT जम्मूमध्ये सोमवारपासून तीन दिवसीय “नॉर्थटेक सिम्पोजियम 2023′ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले अत्याधुनिक ड्रोन, शस्त्रे आणि टेहळणी उपकरणे प्रदर्शित करण्यात आली आहेत. संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या योगदानाची माहिती देण्याबरोबरच भविष्यातील युद्ध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली आहे. यावेळी या प्रदर्शनातील ‘MULE’ या चार पायांवर चालणारे हे उपकरण स्वयंचलित आहे.

(हेही वाचा – Retail Inflation : ऑगस्ट महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर ६.८३ टक्क्यांवर)

स्पायडरमॅनसारखे दिसणारे हे उपकरण एक प्रकारचे AIरोबोटिक सैन्यच आहे. जे शत्रूच्या सीमेत 10 किमी आतपर्यंत जाऊन लक्ष्य गाठू शकते. AIआधारित ऑटोनॉमस मल्टी वेपन एंगेजमेंट सिस्टिम (अँण्टी ड्रोन सिस्टिम)भारतीय सैन्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण 45 डिग्रीपर्यंतच्या पहाडावर चढू शकते. तसेच 18 सेंटीमीटर उंचीच्या पायऱ्यादेखील चढू शकते. रिमोट कंट्रोल, वाय-फाय, एलटीई अशा तिन्ही तंत्रज्ञानाद्वारे हे चालू शकते.

याविषयी लेफ्टनंट कर्नल मिहिर यांनी सांगितले की, हे उपकरण 3 भागांत विभागले आहे. पहिला शस्त्रास्त्रांचा प्लॅटफॉर्म आहे. येथे एलएमजी, रायफल आणि कार्बाइन यासारखी अनेक प्रकारची शस्त्रे बसवता येतात. दुसरा भाग एआय आधारित लॅपटॉप आणि तिसरा कंट्रोलर बॉक्स आहे. यात मुळात दोन मोड आहेत. स्वायत्त आणि मॅन्युअल अशा दोन भागांत हे शस्त्र काम करते. ऑपरेटरला लक्ष्याला मारण्याची परवानगी देते. हे शस्त्र MCEME (MILITARY COLLEGE OF ELECTRONICS AND MECHANICAL ENGINEERING) या प्रणालीअंतर्गत विकसित करण्यात आले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.