खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. (Ajit Doval) या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि जोडी थॉमस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. अजित डोवाल यांनी जोडी थॉमस यांना वॉन्टेड गुन्हेगारांची माहिती आणि ठिकाणेही दिली. कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार भारतीय समकक्ष अजित डोवाल यांच्याकडे केला. एनएसए डोवाल यांनी जोडीला कॅनडाच्या बेतुका आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे मागितले; परंतु कॅनडाचे एनएसए पुरावे देऊ शकले नाहीत. (Ajit Doval)
(हेही वाचा – RTO : आरटीओकडून लायसन्स, आरसीला विलंब झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई होणार; राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे निर्देश)
काही दिवसांपूर्वी झालेल्या या संभाषणात अजित डोवाल यांनी खलिस्तानी फुटीरतावादी, अतिरेकी आणि दहशतवाद्यांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय मिळत असल्याचा मुद्दा थॉमस यांच्यासोबत उपस्थित केला होता, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. कॅनडात आश्रय घेत असलेल्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांबद्दल त्यांनी आपल्या कॅनडियन समकक्षांना सांगितले आणि त्यांची यादीही सुपूर्द केली. अजित डोवाल यांनी जोडी थॉमस यांना सांगितले की, कॅनडाने आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे आणि इनपुट दिल्यास भारत तपास करण्यास तयार आहे. (Ajit Doval)
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची १८ जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर दोन सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांनी कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जोडी थॉमस यांनी गेल्या महिन्यात दोनदा भारतभेट घेतल्याचे उघड झाले आहे. दोन्ही वेळा त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा दावा केला जात आहे. कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार या वर्षी ऑगस्टमध्ये G20 शिखर परिषदेदरम्यान भारतात आले होते. दोन्ही वेळा त्यांची अजित डोवाल यांच्याशी भेट झाली. अहवालानुसार, अजित डोवाल यांच्या भेटीदरम्यान जोडी थॉमस यांनी हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या कथित सहभागाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि तपासात सहकार्य मागितले होते. त्यानंतर भारतीय अजित डोवाल यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्याची मागणी केली होती; परंतु कॅनडा अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पुरावे देऊ शकलेला नाही. (Ajit Doval)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community