India and Pakistan यांच्यात अण्वस्त्रांच्या माहितीची देवाण घेवाण

69

भारत आणि पाकिस्तानने (India and Pakistan) एकमेकांना त्यांच्या अणु प्रतिष्ठानांची यादी शेअर केली. आण्विक प्रतिष्ठापन ही अशी जागा आहे जिथे अण्वस्त्रे ठेवली जातात. 1991 पासून एका करारानुसार ही परंपरा सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानने नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये राजनैतिक माध्यमांद्वारे यादीची देवाणघेवाण केली. यासोबतच भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना कैदी आणि मच्छिमारांची माहिती दिली.

31 डिसेंबर 1988 रोजी दोन्ही देशांमध्ये एक करार झाला. भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) दरवर्षी १ जानेवारीला त्यांच्या अणु आस्थापनांची यादी एकमेकांसोबत शेअर करतील, असा निर्णय या करारात घेण्यात आला होता. दोन्ही देश एकमेकांच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ले करणार नाहीत, असा निर्णयही घेण्यात आला. हा करार 27 जानेवारी 1991 रोजी अंमलात आला. 1 जानेवारी 1992 रोजी पहिल्यांदा दोन्ही देशांनी ही माहिती शेअर केली होती. तेव्हापासून ही माहिती दरवर्षी १ जानेवारीला शेअर केली जाते. माहिती शेअर करण्याची ही 34 वी वेळ होती.

(हेही वाचा Chinmoy Krishna Das यांना दिलासा नाहीच; जामीन अर्ज फेटाळला)

भारत आणि पाकिस्तानकडे किती अण्वस्त्रे आहेत?

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार जून २०२४ पर्यंत भारताकडे १७२ अण्वस्त्रे होती. या बाबतीत पाकिस्तान भारताच्या जवळपास बरोबरीचा आहे. त्याच्याकडे १७० अण्वस्त्रे आहेत.

भारताने ३८१ कैद्यांची यादी पाकिस्तानला सुपूर्द केली

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने ३८१ पाकिस्तानी नागरी कैदी आणि ८१ मच्छिमारांची यादी पाकिस्तानला दिली आहे. त्याचवेळी पाकिस्तानने ४९ भारतीय नागरी कैदी आणि २१७ मच्छिमारांची यादी शेअर केली आहे. आपली शिक्षा पूर्ण केलेल्या १८३ भारतीय कैद्यांची आणि मच्छिमारांची तात्काळ सुटका करून त्यांच्या बोटींसह त्यांना मायदेशी पाठवण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. (India and Pakistan)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.