Nuclear Weapons: पाकिस्तान, चीनकडूनच नाही, तर ‘या’ मुस्लिम देशांकडूनही अणवस्त्रांचा धोका, भारताला वाढवावी लागेल अणुबॉम्बची संख्या, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

चीनने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात घन इंधन DF-41आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार केली आहेत.

226
Nuclear Weapons: पाकिस्तान, चीनकडूनच नाही, तर 'या' मुस्लिम देशांकडूनही अणवस्त्रांचा धोका, भारताला वाढवावी लागेल अणुबॉम्बची संख्या, जाणून घ्या...
Nuclear Weapons: पाकिस्तान, चीनकडूनच नाही, तर 'या' मुस्लिम देशांकडूनही अणवस्त्रांचा धोका, भारताला वाढवावी लागेल अणुबॉम्बची संख्या, जाणून घ्या...

भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बची (Nuclear Weapons) संख्या सातत्याने वाढत आहे. SIPRIच्या अहवालानुसार, चीन आता 1000 अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. भारताच्या अणुबॉम्बची संख्या 172वर पोहोचली आहे, तर पाकिस्तानकडे सध्या 170 अणुबॉम्ब आहेत. चीनकडे 500 अणुबॉम्ब आहेत. SIPRI ने म्हटले आहे की चीन आगामी काळात अणुबॉम्बची संख्या अतिशय वेगाने वाढवत राहील.

चीनही मोठ्या प्रमाणावर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवत आहे, जो अमेरिका आणि भारत या दोघांसाठीही धोकादायक आहे. SIPRIने सांगितले की, भारताकडे हवा, जमीन आणि पाण्यातून आण्विक हल्ले करण्याची क्षमता आहे आणि आता ते लांब पल्ल्याच्या शस्त्रांवर काम करत आहे. त्याचवेळी, विश्लेषकांचे म्हणणे आहे की, केवळ चीनच नाही तर पश्चिम आशियातील अनेक मुस्लिम देशांच्या आण्विक कारवाया पाहता भारतालाही अण्वस्त्रांची संख्या वाढवावी लागेल.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांची मुंबईत सभा; करणार १५ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन )

अण्वस्त्र आणि लष्करी व्यवहारांचे रणनीतीकार आदित्य रामनाथन म्हणतात की, भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत याचा अंदाज मर्यादित माहितीवर आधारित आहे. ते म्हणाले की, भारताकडे अणुबॉम्बचा किती साठा आहे हे आम्हाला माहीत नाही. बहुतेक संशोधन म्हणते की, ते 150 ते 200 दरम्यान आहे. रामनाथन म्हणाले की, भारताच्या अण्वस्त्रांची संख्या वाढली असेल तर ती चीनच्या अण्वस्त्र निर्मितीला थेट प्रत्युत्तर म्हणून आहे. 2021 मध्ये चीन देशाच्या पश्चिम भागात 3 मोठे सायलो बांधत आहे जेथे शेकडो आंतरखंडीय क्षेपणास्त्रे लपवली जाऊ शकतात.

चीनने शेकडो आण्विक बनवली क्षेपणास्त्रे
चीनने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात घन इंधन DF-41आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार केली आहेत. याशिवाय चीनकडे DF-27 हायपरसोनिक ग्लाईड वाहन आहे. भारताने समुद्रातही आपली आण्विक प्रतिकार क्षमता वाढवली आहे. भारताने पाणबुडीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित केले आहे आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकसित करत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनने अण्वस्त्र हल्ला केल्यास भारताला आपल्या अण्वस्त्रांचे संरक्षण कसे करावे, याची चिंता साहजिकच आहे. रामनाथन म्हणतात की, भारताला चीनच्या अणुबॉम्बच्या संख्येशी बरोबरी साधायची नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.