केंद्र सरकारने ‘नक्षल मुक्त भारत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुरक्षा दलांकडून नक्षलग्रस्त भागांमध्ये कठोर कारवाई सुरू असून याला यशही मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारच्या झीरो टॉलरन्स भूमिकेचा पुनरुच्चार वारंवार केला आहे.
Taking a giant stride towards building a Naxal-free Bharat, today our nation achieved a new milestone by significantly reducing the number of districts most affected by left-wing extremism to just 6 from 12. The Modi government is building a Sashakt, Surakshit and Samriddh Bharat…
— Amit Shah (@AmitShah) April 1, 2025
तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे. याचं संदर्भात अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवार, १ एप्रिल रोजी मोठी घोषणा केली आहे. अमित शाह यांनी एक्सवर लिहिले आहे की, “देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या आता सहावर आली आहे. पूर्वी या जिल्ह्यांचा आकडा १२ होता, परंतु गेल्या काही महिन्यांत सरकारने नक्षलवादाच्या विरोधात ज्या पद्धतीने मोहीम सुरू केली आहे त्यामुळे ही संख्या कमी होऊन मोठा दिलासा मिळाला आहे.” (Amit Shah)
हेही वाचा-दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; Ashish Shelar यांचे आश्वासन
“नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, आज आपल्या देशाने डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२ वरून ६ पर्यंत कमी करून एक नवीन टप्पा गाठला आहे. मोदी सरकार नक्षलवादाबद्दल कठोर दृष्टिकोन आणि सर्वव्यापी विकासासाठी अथक प्रयत्नांसह सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण करत आहे. भारत ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद कायमचा समूळ नष्ट करण्याचा निर्धार करत आहे.” (Amit Shah)
हेही वाचा- अमेरिकेसाठी धोक्याचा इशारा; २० टक्के ख्रिस्ती धर्मियांनी स्वीकारला Islam
केद्रीय गृह मंत्रालयानुसार, डाव्या विचारांच्या नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कारवाया आणि हिंसाचार सुरू असून अशा जिल्ह्यांची सर्वात गंभीर तसेच दखल घेण्याइतपत प्रभाव असलेले जिल्हे अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या वर्गवारीच्या अनुषंगाने अशा जिल्ह्यांचा आढावा घेतला जातो. नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांत महाराष्ट्रातील गडचिरोलीसह छत्तीसगडमधील बिजापूर, कांकेर, नारायणपूर, सुकमा तसेच झारखंडमधील पश्चिम सिंहभूम या जिल्ह्याचा समावेश आहे. (Amit Shah)
हेही वाचा- Waqf Bill : शिवसेना उबाठाची पळापळ!
गेल्या आढाव्यानुसार, १२ सर्वात जास्त नक्षल प्रभावित जिल्हे होते. अधिकृत नोंदीनुसार, २०१५ मध्ये असे ३५ जिल्हे, २०१८ मध्ये ३० जिल्हे आणि २०२१ मध्ये २५ जिल्हे होते. आता हा आकडा वेगाने कमी होत आहे. गेल्या १० वर्षांत २९ जिल्ह्यांमधून नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे आणि आता नक्षलवाद हा फक्त सहा जिल्ह्यांमध्ये उरले आहे हे स्पष्ट झाले आहे. (Amit Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community