#Agnipathscheme: अग्निवीरांसाठी 56 हजाराहून अधिक अर्ज

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये विरोध करण्यात आल्याने या योजनेवरून चांगलीच चर्चा झाली. ही योजना मागे घ्यावी यासाठी अनेक निदर्शने होत आहे. दरम्यान, सुशील कुमार मोदींनी मंगळवारी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले अद्याप सात दिवस बाकी असून आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक युवकानी हवाई दलात अग्निवीर होण्यासाठी अर्ज केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची ५ जुलैही अखेरची तारीख आहे.

(हेही वाचा – आता Free मध्ये मिळणार VIP नंबर! ‘ही’ टेलिकॉम कंपनी देतेय ऑफर)

काय केले ट्विट

तरुणांनी एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज करून सरकार आणि तिन्ही सेवांमध्ये अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण, प्राथमिकता आणि वयोमर्यादेत शिथिलता अशा अनेक मुद्द्यांवरील सरकारच्या आश्वासनावरुन होणारे अनेक गैरसमज दूर केले आहे, असे सुशील कुमार मोदींनी ट्वीट केले आहे. तसेच त्यांनी युवकांना आवाहन देखील केले आहे. ते म्हणाले, आता तरुणांनी कोणत्याही गोष्टीत न पडता जास्तीत जास्त संख्येने अग्निवीर बनण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.

आरोपांवर दिले स्पष्टीकरण

दरम्यान, ५६ हजार अर्जदारांवर विरोधकांनी आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. बिहार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी आरजेडी-काँग्रेसच्या आमदारांनी निदर्शने केली. दरम्यान मेहबूब आलम म्हणाले की, अग्निपथ योजनेवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे. अग्निपथ योजनेंतर्गत सुरू झालेल्या भरतीमध्ये एकही विद्यार्थी नाही. ते सर्व भाजप आणि आरएसएस संघाचे कार्यकर्ते आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजप, आरएसएसचे कार्यकर्ते बेरोजगार आहेत, म्हणून ते या योजनेतून लष्करात जात असल्याचेही त्यांनी सांगितले, या आरोपावर राज्यसभेचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here