नाशिकच्या Artillery Center स्फोट प्रकरणात ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश

157
नाशिकच्या Artillery Center स्फोट प्रकरणात 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश
नाशिकच्या Artillery Center स्फोट प्रकरणात 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश

नाशिक येथील आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असताना बॉम्ब गोळ्याचा स्फोट झाल्यामुळे दोन अग्नीवीरांचा मृत्यूची (Agniveer died) सैन्य दलामार्फत ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे (Court of Inquiry) आदेश देण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की सैन्य दलाची आवड युवकांमध्ये निर्माण व्हावी आणि दुसरीकडे सैन्य दलाकडे अधिकाधिक युवक आकर्षित व्हावे या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे युवकांसाठी सैन्य दलामध्ये येण्याचे करता अग्नीवीर ही योजना सुरू केली आहे. (Artillery Center)

या युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष सैन्य दलाच्या तळावरती पाठविण्यात येते प्रशिक्षण चालू असताना नाशिक येथील आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षण सुरू असताना अचानक बीपी तीन लेटेस्ट देवळाली फायरिंग रेंज या ठिकाणी प्रशिक्षण सुरू असताना गोहिल विश्वरिज सिंग (२०) व सैफत शित (२१) हे बॉम्ब लोड करीत असताना त्याचा स्फोट झाला यामध्ये हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी असलेले प्रशिक्षणासाठी असलेले नाईक सचिन चव्हाण आर.एच.एम (ओ.आय.जी) आदर्श लिके यांनी नायब सुभेदार सुदेश मागेन, सुभेदार सुंदरराज आदींनी एम.एस. हॉस्पीटल देवळाली कॅम्प येथे घेऊन गेले असता डॉ. गोयरी यानी तपासुन मयत घोषित केले . याबाबतचा गुन्हा हा देवळाली छावणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.  (Artillery Center)

(हेही वाचा – काँग्रेसला धक्का…आमदार Sulbha Khodke पक्ष सोडणार; सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून केले निलंबित)

आता याप्रकरणी सैन्य दलाने देखील हे सर्व प्रकरण गंभीरतेने घेतले असून याबाबत सैन्य दलाच्या न्यायालयामार्फत चौकशी करण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबतचा आदेश सैन्य दलाचे प्रमुख यांनी दिले असून या चौकशीला सुरुवात झालेली आहे असे नासिक येथील अर्टिलरी सेंटरच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे सर्वसाधारण या चौकशीला पूर्ण होण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यानंतर काय प्रकार आहे कशामुळे ही घटना घडली हे समोर येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.