NDA : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वतीने कार रॅलीचे आयोजन

184

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 75 गौरवशाली वर्धापन दिनानिमित्त संयुक्त सेवा विभाग आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) वतीने कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या  दिल्ली ते ग्वाल्हेर या टप्प्याला आज चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष (CISC) लेफ्टनंट जनरल जे.पी. मॅथ्यू यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

मेजर जनरल इनायत हबीबुल्लाह यांच्या नेतृत्वात 1954 मध्ये राबवल्या गेलेल्या ऑपरेशन ‘बादली’ या मोहीमेचे स्मरण करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. डेहराडून हे या रॅलीच्या सुरुवातीचे मूळ ठिकाण असणार आहे. तिथून ही रॅली ग्वाल्हेर, महू, नाशिक, मुंबई यांसारख्या सशस्त्र दलांच्या महत्त्वाची ठाणी असलेल्या शहरांमधून मार्गक्रमण करणार आहे. सहा दिवसांमध्ये 1800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (NDA) या रॅलीचा समारोप होईल. या कार्यक्रमाला हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह, नौदलाचे उप प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंह, कार्यवाहक उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आइच, राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अजय कोचर यांच्यासह तिन्ही सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा Ajit Pawar : मी ६० वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी ३८व्या वर्षी घेतली; अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर केली टीका)

महिंद्रा ऑटो कंपनीने मुंबईहून वाहने बदलण्याची सोय उपलब्ध करून देत या रॅलीसाठी आपले सहकार्य दिले आहे. त्याची दखल घेत त्यांचा गौरव केला गेला. यासोबतच इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि भारतीय आंतरराष्ट्रीय नौदल सेवेने प्रशासकीय तसेच रॅलीच्या प्रवास नियोजनात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही गौरव केला गेला. अनेक आव्हानांचा सामना करत ही रॅलीचा आपला प्रवास पूर्ण करणार आहे, या प्रवास म्हणजे राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA)  शौर्य, साहस आणि बलिदानाचा वारसा सांगणारी साक्षच ठरणार आहे. महिंद्रा ऑटोचे वरिष्ठ अधिकारी, आयोजक, इतर सहभागी मान्यवर आणि या रॅलीच्या आयोजनात योगदान देणाऱ्या प्रत्येकाप्रती आभार मानत या कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी प्रत्येकानं एकमताने सर्वोत्तम जडण घडण, राष्ट्रीय अखंडता आणि राष्ट्रउभारणीच्या कामासासाठी समर्पण वृत्तीने काम करत राहण्याचे आवाहनही केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.