आयएसआय हनीट्रॅपसाठी पाकिस्तानी अभिनेत्रींचा करते वापर; पाकच्या माजी सैन्य अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

पाकिस्तानातील राजकीय नेते किंवा बहु प्रतिष्ठित व्यक्तींना फसवण्यासाठी आयएसआय पाकिस्तानातील अभिनेत्रींचा वापर करते, असा खळबळजनक दावा माजी सैन्य अधिकारी मेजर आदिल राजा यांनी केला आहे. या अभिनेत्रींचा हनीट्रॅपसाठी उपयोग केला जात आहे.

आयएसआय प्रमुख आणि लष्करप्रमुखावरही आरोप 

पाकिस्तानमध्ये गेल्याच महिन्यात निवृत्त झालेल्या लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि आयएसआयचे माजी चिफ जनरल फैज हे अधिकारी अभिनेत्रींना आयएसआयच्या मुख्यालयात किंवा सेफ हाऊसमध्ये घेऊन जायचे आणि त्यांच्याशी शरीर संबंध ठेवायचे असा दावा मेजर आदिल राजा यांनी केला. आपल्या व्हिडीओ ब्लॉगमध्ये राजा यांनी हे दावे केले आहेत. यामुळे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीसह लष्कर आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे आयएसआय अधिकारी या अभिनेत्रींना हनीट्रॅप करण्यासाठी देशातील राजकारणी आणि इतर शक्तिशाली लोकांकडे पाठवतात आणि नंतर त्यांचे व्हिडिओ बनवतात. आदिल राजा यांनी सुरुवातीला या अभिनेत्रींची नावे घेतली नाहीत, त्यांचा फक्त MH, MK आणि SA अशा नावांनी उल्लेख केला आहे. या खळबळजनक दाव्यानंतर, मेहविश हयात, माहिरा खान, सजल अली आणि कुबरा खान या अभिनेत्रींच्या फोटोंसह आदिल राजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आदिल राजाच्या या दाव्यावरून पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. मेहविश हयात तीच अभिनेत्री आहे जिचे नाव माफिया डॉन दाऊद इब्राहिमशीही जोडले गेले होते.

(हेही वाचा यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला मिळणार का चांगली बातमी?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here