देशात दहशतवाद्यांनी घातपातचा मोठा कट रचल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे राम मंदिर, २६ जानेवारी, जी-२० परिषद लक्ष्य आहे. राम मंदिरावर आत्मघाती बॉम्बहल्ला, २६ जानेवारीला दिल्ली आणि पंजाबसह इतर महत्त्वांच्या शहरांमध्ये घातपात आणि जी-२० परिषदेत सायबर हल्ल्या असा कट दहशतवाद्यांची आखला आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी अल-कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याचा कट असल्याचा सतर्कतेचा इशारा गुप्तचर संस्थेने दिला आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेने या हल्ल्याचा कट आखल्याची माहिती मिळत आहे. तसेच नेपाळ, पाकिस्तान मार्गी अतिरेकी पाठवण्याचे षडयंत्र आखल्याचे समोर आले आहे. यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस अलर्ट झाले असून नेपाळ-भारत सीमेवरील मुमेंटचा तपास केला जात आहे.
२६ जानेवारी संदर्भातील अलर्ट
२६ जानेवारीला दिल्ली आणि पंजाबसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेकडून घातपात करण्याची तयारी केल्याचे सांगितले गेले आहे. यासाठी पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेची मदत घेतली आहे. यात दाऊद इब्राहिम गँगचा देखील हात आहे. शिवाय बांगलादेशी अतिरेकी संघटनेचाही वापर केला जात आहे. इतर संघटनांचाही देशात घातपात करण्यासाठी वापर केला जात असल्याचे सांगितले गेले आहे.
जी-२० परिषद संदर्भातील अलर्ट
इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा संघटनेने जी-२० परिषदेवर सायबर हल्ला करण्याचा कट रचला आहे. ज्यावेळी जी-२० परिषदेमध्ये हॉर्नेट प्रतिनिधी येतील, त्यावेळी सायबर अटॅक केला जाण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Nepal Plane Crash: नेपाळ विमान दुर्घटनेत पाच भारतीयांचा मृत्यू)
Join Our WhatsApp Community