‘पाक’चा डाव BSF ने उधळला! ड्रोनमधून भारतात पाठवले होते ‘टिफिन बॉम्ब’

160

पाकिस्तानचा डाव सीमा सुरक्षा दलाने ( BSF) उधळून लावला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीर भागात ड्रोनचा वापर करत टिफिन बॉक्समधून टाईम बॉम्ब पाठवले होते. पण बीएसएफने हा डाव उधळत बॉम्ब निष्क्रिय केले आहेत.

( हेही वाचा : PNB Bank Scam: फरार आरोपी मेहूल चोक्सी आणि त्याच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल )

बीएसएफला पाकिस्तानी ड्रोन आढळले

माहितीनुसार सोमवारी रात्री 11 च्या सुमारास कानाचक परिसरात बीएसएफला हे पाकिस्तानी ड्रोन आढळले. भारतीय जवानांनी त्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर लगेचच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ड्रोनला जोडून मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले तीन चुंबकीय आयईडी बॉम्ब होते. या बॉम्बमध्ये टाइमर वेगवेगळ्या वेळेसाठी सेट केला गेला होता. हे आयईडी बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था

हा ड्रोन हवेत सुमारे 800 मीटर उंचीवर उडत होता. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 30 जूनपासून 43 दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. यापूर्वी कठुआ जिल्ह्यात सुद्धा बीएसएफने एक ड्रोन पाडला होता. त्यामध्ये स्फोटकं सदृश्य वस्तू आढळल्या होत्या तेथील स्थानिकांना हे संशयित ड्रोन दिसले होते. सीमेपलीकडून सातत्याने ड्रोनच्या हालचाली होत असल्याने पोलिसांची शोध पथके परिसरात तैनात करण्यात आली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.