Pakistan-Iran Conflict: पाकिस्तानचा इराणच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला, 9 जण ठार

इराणच्या सिस्तान ओ बलुचिस्तान प्रांतातील छुप्या तळांवर पाकिस्तानने लष्करी हल्ले केल्याचे परराष्ट्र कार्यालयानेही म्हटले आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

294
Pakistan-Iran Conflict: पाकिस्तानचा इराणच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला, 9 जण ठार
Pakistan-Iran Conflict: पाकिस्तानचा इराणच्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला, 9 जण ठार

पाकिस्तान आणि इराण (Pakistan-Iran Conflict) या दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला प्रत्युत्तर देत पाकिस्ताननेही गुरुवारी इराणच्या हद्दीतील बलोच दहशतवाद्यांच्या दोन गटांच्या तळांवर ड्रोन आणि रॉकेटच्या सहाय्याने हल्ला केला. त्यात 9 जण ठार झाले आहेत.

पाकिस्तानी हद्दीत दहशतवादी कारवाया करून इराणमध्ये आश्रय घेण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या दोन दहशतवादी संघटना वापरत असलेले छुपे तळ या हल्ल्यात नष्ट करण्यात आले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. इराणच्या सिस्तान ओ बलुचिस्तान प्रांतातील छुप्या तळांवर पाकिस्तानने लष्करी हल्ले केल्याचे परराष्ट्र कार्यालयानेही म्हटले आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

(हेही वाचा –AFC Asian Cup 2024 : भारताचा उझबेकिस्तानकडून ०-३ असा पराभव )

इराणची पाकिस्तानकडे खुलाशाची मागणी
इराणमधील सारावान शहराजवळील एका गावातील दहशतवाद्यांच्या ७ आश्रयस्थानांवर झालेल्या या हल्ल्यात ९ जण ठार झाल्याचे इरना वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हल्ल्यातील सर्व मृत हे विदेशी नागरिक होते, असे इराणचे गृह मंत्री अहमद वाहिदी यांनी म्हटले आहे. इराणचे परराष्ट्र प्रवत्ते नासेर कनानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून याबाबत खुलासा करावा, असे तेहरानमधील पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावून सांगण्यात आले आहे. या हल्ल्यात २ पुरुष, ३ महिला आणि ४ मुले ठार झाल्याचे स्थानिक प्रशासकीय अधिकारी अलिरेझा मराहमती यांनी सांगितले.

जॉर्डनचाही सिरियावर सर्जिकल स्ट्राईक
बैरुत – सिरियाच्या दक्षिण भागात स्वेईदा येथे गुरुवारी पहाटे झालेल्या एका हवाई हल्ल्यात किमान 9 जण ठार झाल्याचे सिरियन कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. ड्रग तस्कर सक्रिय असलेल्या सीमा भागाजवळ झालेला हा हल्ला शेजारी देश जॉर्डनच्या हवाई दलाने केल्याचे वृत्त असले, तरी जॉर्डनने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. ओर्मन गावाजवळ झालेल्या या हवाई हल्ल्यात ३ महिला आणि २ मुलांसह ९ जण मारले गेले, असे ब्रिटनस्थित एका सिरियन स्वयंसेवी संस्थेने सांगितले. मारल्या गेलेल्या लोकांचा ड्रग तस्करीशी काहीही संबंध नव्हता, कदाचित जॉर्डन हवाई दलाला चुकीची माहिती मिळाली असावी, असे या संस्थेचे प्रमुख रामी अब्दुररहमान यांनी सांगितले. या हल्ल्यात १० जण मारले गेल्याचे स्थानिक पत्रकार रयान मारौफ यांनी सांगितले. मलाह या गावावरही हल्ला झाला, पण प्राणहानी झाली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.