कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा होत असताना तशाच प्रकारच्या घटना पाकिस्तानातही घडत आहेत. (Pakistan) मौलाना झियाउर रहमान या मौलवीची कराचीमधील गुलिस्तान-ए-जौहर येथील उद्यानात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने आयएसआयची चिंता वाढली आहे. रहमान संध्याकाळी फिरायला बाहेर गेला असतांना मोटारसायकलवरून आलेल्या २ अज्ञात बंदूकधार्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
(हेही वाचा – Mathura Railway Accident : नेमकी ‘ती’ ट्रेन प्लॅटफॉर्मवर कशी चढली , मथुरेतील अपघाताचा व्हिडीओ व्हायरल)
लष्कर-ए-तोयबा या भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेचा मौलाना झियाउर रहमान हा सक्रीय कार्यकर्ता आहे. दहशतवादाच्या आरोपाखाली भारताला हवा असलेला खलिस्तान कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीतसिंग पंजवार मे महिन्यात लाहोरमध्ये त्याच्या घराजवळ मॉर्निंग वॉकला निघाला असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याची हत्या केली होती. त्याच्या हत्येप्रमाणेच ही हत्या करण्यात आल्याने पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय भारतावर आगपाखड करू लागली आहे. आयएसआयने त्यांच्या डझनभर मालमत्ता ‘सेफ हाऊस’मध्ये ठेवल्या आहेत. सप्टेंबरमध्ये रावळकोटमधील अबू कासिम काश्मिरी आणि नाझिमाबादमधील कारी खुर्रम शहजाद या लष्कर-ए-तोयबाच्या इतर २ कार्यकर्त्यांचीही हत्या झाली आहे. (Pakistan)
रहमानच्या हत्येची माहिती १२ सप्टेंबरला मिळाली होती. तो जामिया अबू बकर नावाच्या मदरशात प्रशासक म्हणून काम करत होता. मदरशातून तो दहशतवादी कारवाया करत होता. विशेष म्हणजे पाकिस्तानी पोलिसांनीही त्याच्या हत्येचे वर्णन ‘दहशतवादी हल्ला’ असे केले आहे. पाकिस्तान पोलिसांनी याला ‘टार्गेट किलिंग’ मानले आहे. (Pakistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community