पाकचा ‘नापाक’ प्रयत्न फसला; भारतीय सैनिकांनी पाडले ड्रोन

172

पाकिस्तान नेहमीच भारतविरोधी कुरापती करत असतो. त्याचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय जवान सीमेवर सज्ज आहेत. आता पाकिस्तानचा असाच एक प्रयत्न भारतीय जवावांनी हाणून पाडला आहे. भारत- पाक सीमेवर पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन दिसला, तो जवानांनी पाडला. बीएसएफचे जवान स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शोध मोहीम राबवत आहेत. बुधवारी रात्री ही घटना घडली.

शोध मोहीम सुरू

खेमकरण सेक्टरमध्ये तैनात असलेल्या बीएसएफच्या 101 बटालियनच्या जवानांना 21 डिसेंबरच्या रात्री बीओपी हरभजन येथील बुर्जी क्रमांक-153-6 जवळ हालचाल जाणवली. त्यानंतर सैनिकांनी नाईट व्हिजन कॅमेऱ्यांच्या मदतीने पाकिस्तानकडून येणारा ड्रोन भारतीय सीमेत घुसल्याचे पाहिले. सीमेमध्ये ड्रोन घुसल्याने भारतीय जवान सतर्क झाले. पाकिस्तानकडून येणा-या ड्रोनच्या दिशेने जवानांनी इलू बॉम्ब फेकला आणि अनेक राऊंड फायर केले. त्यानंतर लष्कराने गुरुवारी सकाळी शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान तेथील शेतात हा ड्रोन सापडला. त्यानंतर खेमकरण आणि वलटोहा पोलिसांच्या मदतीने जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. एसएसपी गुरमीत सिंह चौहान यांनी सांगितले की, ज्या भागात ड्रोन जप्त करण्यात आले, त्या भागात शोध मोहीम सुरू आहे. ड्रोनद्वारे सीमेवर काही फेकण्यात आले आहे का, यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे.

( हेही वाचा: IND Vs China Dispute: LAC वर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भारताचा भर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.