सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी बांगलादेशने पाकिस्तानी लष्कराला निमंत्रण दिले आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर प्रथमच ५३ वर्षांनी पाकिस्तानी लष्कर बांगलादेशात पाऊल ठेवणार आहे. पाकिस्तानी मेजर जनरल दर्जाचा अधिकारी हे प्रशिक्षण देईल. हे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू होईल. मोमेनशाही लष्करी छावणीतील प्रशिक्षण मुख्यालयात हे प्रशिक्षण होईल. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा एक वर्षाचा असेल, त्यानंतर लष्कराच्या (Bangladesh Army) १० ही विभागांना प्रशिक्षण देण्यात येईल. पाक आणि बांगलादेश एकत्र येणार असल्याने भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
(हेही वाचा – Palghar Railway Accident : पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर)
नौदल कराची (Karachi) बंदरावर सराव करणार आहे. या संयुक्त सरावाला ‘अमन २०२५’ (Aman Exercise 2025) असे नाव देण्यात आले आहे. सुमारे १५ वर्षांनी अशा सरावात बांगलादेश सहभाग घेत आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या राजवटीत बांगलादेश अशा सराचात भाग घेत नव्हते. पाकिस्तानच्या तैमुर या युद्धनौकेला बांगलादेशी बंदरावर थांबा देण्यास हसीना यांनी नकार दिला होता. या दोन्ही देशांच्या जवळीकीकडे संरक्षण तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत. बांगलादेशचे महत्त्व सिलीगुडी कॉरिडॉरसाठी महत्त्वाचे आहे. तेथून ईशान्य भारताचा भाग उर्वरित देशाशी जोडला जातो. कालौघात जर ही जवळीक वाढली, तर पूर्व भारतात इस्लामिक धर्माधतेचा धोका वाढण्याची भीती आहे.
पाकिस्तानी (Pakistan) लष्कराचे सहप्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा यांनी नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षणाचा प्रस्ताव पाठवला होता. बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकेर-उझ-झमन यांनी तो स्वीकारला. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराला अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आला. बांगलादेशने पाकिस्तानला शस्त्रे आणि दारूगोळा पुरवठ्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही मागणी तिप्पट आहे. या शिवाय तोफगोळ्यांचे दोन हजार राऊंड आणि ४० टन आरडीएक्स मागवण्यात आले आहे.
भारतासाठी धोका
गेल्या आठवड्यात आठ संशयित दहशतवाद्यांना आसाम, केरळ आणि प. बंगालमधून अटक करण्यात आली होती. हे सर्वजण बंदी घातलेल्या अन्सरुल्लाह बांगला टीमशी संबंधित होते. अमेरिकन ब्लॉगर अविजित रॉय याची ढाक्यात हत्या केल्यानंतर ही संघटना चर्चेत आली होती. यातील एक जण अनधिकृत मदरशात रहात होता. त्याला अटक करेपर्यंत तो ३०-४० जणांना प्रशिक्षित करत होता.
हेही पहा –