पाकिस्तानकडून गेल्या दोन वर्षांत तब्बल 5 हजार 601 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तर प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी चौक्या आणि सैन्याचे नुकसान झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेतील लेखी उत्तरात दिली.
पाकिस्तानी चौक्या आणि जवानांचे लक्षणीय नुकसान
संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या कार्यान्वयन नियंत्रणाखाली असणाऱ्या नियंत्रणरेषेवर 30 नोव्हेंबर 2019 ते 29 नोव्हेंबर 2021 या काळात एकूण 5,601 वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन झाल्याची नोंद झाली. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य फॉरवर्ड चौक्यांवर तैनात सैन्य बळाला असते. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवायांमध्ये पाकिस्तानी चौक्या आणि जवानांचे लक्षणीय नुकसान झाल्याचे भट्ट यांनी सांगितले.
(हेही वाचा महाराष्ट्र बंद : उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला विचारला जाब! म्हणाले…)
Join Our WhatsApp Community