‘…त्यासाठी पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील’, राजनाथ सिंह यांचा थेट इशारा

140

पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीयांवर पाकिस्तानकडून अनेक अत्याचार करण्यात येत आहे. याचबाबत आता भारताचे संरक्षण मंत्री मोठे विधान केले असून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर जे अन्याय आणि अत्याचार पाकिस्तानकडून करण्यात येत आहेत त्याचे परिणाम पाकिस्तानला नक्कीच भोगावे लागतील असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

तेव्हाच जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास साध्य होईल

शौर्य दिवस कार्याक्रमाला गुरुवारी राजनाथ सिंह यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी हे विधान करतानाच पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवण्यासंदर्भात सूचक विधान देखील त्यांनी केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्टानपर्यंत पोहोचल्यानंतरच साध्य केले जाईल, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

(हेही वाचाः तुम्ही हिंदू असाल तर हलाल का खाणार? जाणून घ्या हलाल पदार्थांची यादी…)

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विकास यात्रेला आपण 370 कलम हटवून सुरुवात केली आहे. पण आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्टानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल, असे विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. केवळ भारताला निशाणा बनवणे हाच दहशतवाद्यांचा एकमेव हेतू असल्याचेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.