श्रीगंगानगर (Sriganganagar) जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) (BSF) घुसखोराला (Pakistani infiltrator killed) ठार केले. मंगळवारी (24 डिसेंबर) रात्री 12.30 च्या सुमारास पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. एसपी गौरव यादव यांनी सांगितले की, केसरीसिंगपूर भागातील एक्स गावाजवळ ही घटना घडली. घुसखोर भारतीय सीमेवरील पिलारच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होता. (Pakistani infiltrator killed)
हेही वाचा-Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये समुद्रकिनारी विमान क्रॅश; Video Viral
दरम्यान, बीएसएफच्या जवानांनी त्याला इशारा दिला. तरीही त्याने ऐकले नाही. यानंतर जवानांनी त्याला ठार केले. त्याच्याजवळ काही पाकिस्तानी चलन, सिगारेटची पाकिटे आणि इतर काही वस्तू सापडल्या आहेत. सीमेवर मारल्या गेलेल्या घुसखोराची माहिती गोळा केली जात आहे. लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. घुसखोराकडून एक ओळखपत्र सापडले असून, त्यावर उर्दूमध्ये काहीतरी लिहिले आहे. (Pakistani infiltrator killed)
घटनास्थळ श्रीगंगानगर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी धुक्यामुळे पोलीस ग्रामीण भागात पोहोचू शकले नाहीत. घुसखोराने कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्याचा चेहरा झाकलेला होता. पोस्टमॉर्टमनंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे बीएसएफ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केसरीसिंगपूरचे एसएचओ जितेंद्र स्वामी म्हणाले, बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी घुसखोरासोबत काय सापडले आणि तो कोणत्या उद्देशाने येथे आला होता, याबाबत आम्ही कोणतीही माहिती उघड करू शकणार नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Pakistani infiltrator killed)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community