Jammu and Kashmir मध्ये पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान !

Jammu and Kashmir मध्ये पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान !

43
Jammu and Kashmir मध्ये पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान !
Jammu and Kashmir मध्ये पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान !

जम्मूमधील (Jammu and Kashmir) आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्क असलेल्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आरएस पुरा सेक्टरमधील अब्दुलियन भागात बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. (Jammu and Kashmir)

हेही वाचा-Ram Navami : इफ्तार आणि ईदला परवानगी आहे, पण राम नवमीला परवानगी नाही; जाधवपूर विद्यापीठात हा कसला नियम ?

यासंदर्भात बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा सैन्याच्या तुकडीला 4 आणि 5 एप्रिलच्या मध्यरात्री आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. एका व्यक्तीने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला बीएसएफ जवानांनी अनेक वेळा इशारा देऊनही आणि गोळीबार करूनही घुसखोर माघारी परतला नाही. (Jammu and Kashmir)

हेही वाचा- China Increases Import Tariffs : चीननेही प्रत्युत्तरात अमेरिकेवर लादला 34% कर ; शिवाय 16 अमेरिकन कंपन्यांना सेमीकंडक्टरची निर्यात करणे रोखले

यामुळे सुरक्षा दलाने गोळीबार करून त्याला ठार केले. या घुसखोराची ओळख पटवली जात आहे. बीएसएफने सीमेपलीकडून झालेल्या घुसखोरीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेची अधिकारी अधिक चौकशी करत आहेत. (Jammu and Kashmir)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.