Pakistani कुटुंबाला अटक, ‘हिंदू’ आडनाव लावून गेली १० वर्षे भारतात वास्तव्य

आरोपीला १० दिवसांची पोलिस कोठडी

125
Pakistani कुटुंबाला अटक, 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्षे भारतात वास्तव्य
Pakistani कुटुंबाला अटक, 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्षे भारतात वास्तव्य

कर्नाटकची राजधानी बंगळुरू (Bengaluru) येथून दि. १ ऑक्टोबर रोजी ४ पाकिस्तानी (Pakistani) नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. यात चार पैकी दोन महिला असून चौघांकडूनही बनावट कागदपत्र,ओळखपत्र, पासपोर्ट आढळले आहेत. चौघं आरोपी गेल्या १० वर्षापासून भारतात धर्मप्रसाराचे काम करत असून स्वत:ला हिंदू (Hindu) म्हणवून घ्यायचे. २०१८ साली ते बंगळूरमध्ये (Bengaluru) आले असून त्यांना जिगानी (Jigani) येथे अटक करण्यात आली. याआधी ते २०१४ ला दिल्ली येथे राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघं आरोपी हे पाकिस्तान येथील असून रशिद अली सिद्धीकी (Rashid Ali Siddiqui) उर्फ शंकर शर्मा, आयशा उर्फ आशा रानी, हनीम मोहम्मद उर्फ रामबाबू शर्मा, रुबीना उर्फ रानी शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. बंगळुर (Bengaluru) पोलिसांना आरोपींना कोर्टात हजर केले असून त्यांना १० दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान आरोपींच्या अटकेनंतर तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आरोपींवर पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत कलम १२(१), १२(१एबी), १२(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपींची हिंदू (Hindu) नावाने पासपोर्ट बनवले गेले होते. मात्र घराची झडती घेतल्यावर भिंतीवर ‘मेहंदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न ए यूनूस (Mehndi Foundation International Jashn A Yusuf) असे लिहलेले निदर्शनास आले. तसेच पाकिस्तानी (Pakistani) नेत्यांचेही फोटो लटकवलेले आढळले.

(हेही वाचा : India Monsoon : भारतात दरवर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस, २०२० नंतरचा सर्वोत्तम मान्सून )

खर्चासाठी मेंहदी फाऊंडेशनची आरोपीला मदत

या प्रकरणातील मुख्य आरोपी रशिद अली सिद्दीकी (Rashid Ali Siddiqui) कराचीतील लियाकतबादचा रहिवासी आहे. तो त्याची पत्नी आणि आई-वडिल भारतात हिंदू (Hindu) बनून राहतात. पत्नी आयशा ही लग्नाआधी कुटुंबासह बांगलादेशात राहायची पुढे तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी रशिदशी ओळख झाली. दरम्यान पाकिस्तानी (Pakistani) नेत्यांकडून रशिदचा छळ झाल्यामुळे तो पत्नीसह बांगलादेशात राहायला गेला. त्यावेळी खर्चासाठी मेंहदी फाऊंडेशन (Mehndi Foundation International Jashn A Yusuf) त्यांना मदत करत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.